शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर गावागावात लागताहेत पैजा

By admin | Updated: February 20, 2017 01:31 IST

विजयाचे दावे-प्रतिदावे : मतपेटय़ा ठेवलेल्या स्ट्रॉगरुमबाहेर बंदोबस्त; मतमोजणीचे प्रशासनाकडून नियोजन

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरुवार 16 रोजी मतदान प्रक्रिया आटोपली. गुरुवार 23 रोजी मतमोजणी होणार आहे.गट व गणनिहाय लढतीच्या चर्चा ग्रामीण भागातील पारावर जोरदार चर्चा रंगत असून पैजाही लागत आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. कुणाची सत्ता येईल, याबाबत पैजा लागत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून मतपेटय़ा ठेवलेल्या ‘स्ट्राँग रुम’बाहेर पोलिसांचा जागता पहारा सुरु आहे. उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांची नित्याची दिनचर्यागुरुवार 16 रोजी मतदान झाल्यानंतर जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी घरीच थांबत कार्यकत्र्याच्या भेटीगाठी घेणे पसंत केले. तसेच आठवडाभराच्या प्रचारानंतर आलेल्या थकव्यामुळे काही उमेदवारांनी आराम करणे पसंत केले. तर काही उमेदवारांची दिनचर्या नेहमीप्रमाणे राहिली.प्रशासनाने केली तयारी सुरुगुरुवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर तालुकानिहाय मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. जळगाव तालुक्यातील गट व गणांसाठी झालेली मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. मतमोजणीसाठी टेबल लावण्याचे तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना उभे राहण्यासाठीचे नियोजन सुरु केले आहे. येत्या दोन दिवसात या नियोजनाला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.मतदानानंतर ग्रामीण भागातील चावडी व चौकाचौकात आता कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणत्या भागात कोणत्या उमेदवाराला जादा मतदान मिळाले ते जातीय समिकरणे, मतदानासाठी पैसे वाटपाचे सूत्र यासा:या चर्चा आता पारावर रंगत आहेत. यासा:यातून आपल्या समर्थक उमेदवारांच्या विजयाची काही पाठिराखे खात्री घेत एक हजार ते 50 हजारांर्पयत पैज लावली जात आहे. रात्री उशिरार्पयत चौकात व पारावर चर्चा रंगत आहेत.4जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर अंतर्गत वादविवाद देखील सुरु झाले आहेत. प्रचार व जेवणावळीसाठी आपल्यासोबत राहून मतदान विरोधी पक्षाच्या उमेदवाराला केल्यामुळे अंतर्गत वाद सुरु झाले आहेत. तसेच प्रचारावेळी वैयक्तिक पातळीवर आरोप केल्यावरून देखील आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत.स्ट्राँग रुम बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे मतदान झाल्यानंतर ज्या ठिकाणी मतपेटय़ा ठेवल्या आहे त्या स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील कर्मचा:यांची या ठिकाणी  नियुक्ती करण्यात आली आहे. यासह या भागात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहे.