शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांनंतर सोने पुन्हा ४७ हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:44 IST

जळगाव : आयात शुल्कात कपातीपाठोपाठ आता डॉलरचे दरही कमी होऊ लागल्याने सोन्या-चांदीत चांगलीच घसरण होत आहे. यात शुक्रवार, १९ ...

जळगाव : आयात शुल्कात कपातीपाठोपाठ आता डॉलरचे दरही कमी होऊ लागल्याने सोन्या-चांदीत चांगलीच घसरण होत आहे. यात शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ९०० रुपयांवर आले, तर चांदीतही एक हजार ८०० रुपयांनी घसरण होऊन ती ६८ हजार ७०० रुपयांवर आली आहे. नऊ महिन्यांनंतर सोने पुन्हा ४७ हजारांच्या खाली तर सहा महिन्यांनंतर चांदी ६९ हजारांच्या खाली आहे.

लॉकडाऊन असले, तरी गेल्या वर्षी मे महिन्यात मल्टी कमोडीटी बाजारात उलाढाल होऊन सोन्या-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम राहत, त्यानंतर भाव कमी-कमी होऊ लागले. त्यात आता केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्कात अडीच टक्क्याने कपात झाली व तेव्हापासून भाव आणखी कमी होत गेले.

घसरण कायम

अर्थसंकल्पानंतर मध्यंतरी किरकोळ भाववाढ वगळता सोन्या-चांदीत घसरण कायम आहे. यात शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी सोने नऊ महिन्यांच्या निच्चांकीवर गेले. १८ रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १९ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ४६ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. या पूर्वी ७ मे, २०२० रोजी सोने ४६ हजार रुपयांवर होते. त्यानंतर, त्यात हळूहळू वाढ होत जाऊन ५ जून, २०२० रोजी ते ४७ हजारांच्या पुढे गेले व सोन्याचे भाव ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर, ही भाववाढ कायम राहिली. मात्र, दिवाळीनंतर हे भाव कमी-कमी होत जाऊन आता ते ४७ हजारांच्या खाली आहे.

अशाच प्रकारे चांदीचेही भाव सहा महिन्यांनंतर ६९ हजारांच्या खाली आले आहेत. ३ ऑगस्ट, २०२० रोजी चांदी ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर, दोनच दिवसांत चार हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ५ ऑगस्ट, २०२० रोजी चांदी थेट ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, दिवाळीनंतर हे भाव कमी-कमी होत गेले.

मागणी कमी, आयात शुल्क कपात व आता डॉलरचे दर घसरले

अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी होण्यासह सध्या लग्नसराई नसल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. त्यात तीन दिवसांपासून डॉलरचे दर दररोज कमी-कमी होत आहेत. १७ रोजी ७२.९२ रुपयांवर असलेले डॉलरचे दर १८ रोजी ७२.७८ रुपयांवर आले. १९ रोजी हे भाव आणखी कमी होऊन ते ७२.५३ रुपयांवर आले. त्यामुळेही सोन्या-चांदीचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

भाववाढ व घसरणीचा प्रवास

दिनांक सोने चांदी

७ मे, २०२० ४६,००० ४४,०००

५ जून, २०२० ४७,३०० ५०,०००

३ ऑगस्ट, २०२० ५४,७००० ६६,५००

५ ऑगस्ट, २०२० ५५,८०० ७१,०००

१९ फेब्रुवारी, २०२१ ४६,९०० ६८,७००

——————-

अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील आयात शुल्क कमी होण्यासह सध्या लग्नसराई नसल्याने, तसेच अमेरिकन डॉलरचे दरही कमी होत असल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत आहे.

- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन