शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरानंतर नाशिक, औरंगाबादला बसेस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना ...

कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, १ जूनपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता उठविण्यात आल्यामुळे महामंडळातर्फे मंगळवारपासून पुन्हा बस सेवा सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी जळगाव आगारातून नाशिक, औरंगाबाद, धुळे यासह जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, रावेर या ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या.

इन्फो

तालुकास्तरावरही फेऱ्या वाढविल्या

विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले की, मंगळवारपासून परजिल्ह्यात बस सेवा सुरू झाल्यानंतर, तालुका स्तरावर प्रत्येक गावांना बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. जसे प्रवासी मिळतील, तशा बसेस सोडण्याचे सर्व आगरांना आदेश दिले असल्याचे सांगितले. तसेच निर्बंधानंतर तब्बल महिनाभराने बाहेरगावी बसेस जात असून, पहिला दिवस असल्याने फारसे प्रवासी मिळण्याची शक्यता कमी आहे. जसजशी नागरिकांना बससेवा सुरू झाल्याची माहिती होईल, त्यानुसार प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने प्रत्येक गावांना बसेस सोडून, बस फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याचे बंजारा यांनी सांगितले.

इन्फो :

तर ५ लाखांच्या वर उत्पन्न मिळण्याची शक्यता

आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकासांठीच सोडण्यात येणाऱ्या बसेस आता, सर्व सामान्य नागरिकानांही प्रवासासाठी खुल्या झाल्या आहेत. जळगावसह जिल्हाभरातील आगारातून मंगळवारी प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या गावांना बसेस सोडण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांनी केल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात जिल्हाभरातील सर्व ११ आगार मिळून पाच ते सहा लाखांच्या घरात उत्पन्न मिळणार असल्याची शक्यता महामंडळातर्फे वर्तविण्यात आली.

इन्फो :

महामंडळाच्या सूचनेनंतर ‘शिवशाही’ सुरू होणार

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शिवशाही बसदेखील बंद आहे. जळगाव आगारातर्फे आतापर्यंत पुणे, नाशिक व औरंगाबाद मार्गावर या बसेस चालविल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे महामंडळाने शिवशाही बसेस सध्या बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, शासनाच्या सूचनेनुसारच यापुढे शिवशाही बसेस सुरू ठेवणार असल्याचेही दिलीप बंजारा यांनी सांगितले.