शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खासगी मक्तेदाराच्या अपयशानंतर, आता आयआरटीसी मैदानात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : तीन वर्षांपूर्वी आयआरटीसीने खासगी मक्तेदारामार्फत येथील रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी केली होती. मात्र, अत्यंत महागड्या पदार्थांमुळे प्रवाशांचा ...

जळगाव : तीन वर्षांपूर्वी आयआरटीसीने खासगी मक्तेदारामार्फत येथील रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी केली होती. मात्र, अत्यंत महागड्या पदार्थांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने वर्षभरातच हे कॅन्टिन गुंडाळण्यात आले. कॅन्टिन चालविण्यात खासगी मक्तेदार अपयशी ठरल्यानंतर आता ‘आयआरटीसी’ने घरगुती पद्धतीचे जेवण ठेवण्याचा निर्णय घेऊन स्वत: कॅन्टिन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळप्रमाणे जळगाव रेल्वे स्थानकावरही बहुतांश गाड्यांना थांबा आहे. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असल्याने रात्रभर प्रवाशांची वर्दळ असते. दरम्यान, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना किंवा गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात घरगुती पद्धतीचे जेवण मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे प्रवाशांची ही गरज भागविण्यासाठी ‘आयआरटीसी’तर्फे रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी करण्यात येत आहे. प्लॅटफार्म क्रमांक तीनवर कॅन्टिनचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, यानंतर फर्निचरचे काम हाती घेण्यात येणार आहे. मार्चअखेर प्रवाशांच्या सेवेत कॅन्टिनची सुविधा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

घरगुती पद्धतीचे मिळणार जेवण :

रेल्वे प्रशासनातर्फे या कॅन्टिनमध्ये वडापाव, समोसा, इडली, भजी, चहा, विविध प्रकारची थंड पेये, बिस्किटे यासह घरगुती पद्धतीचे भाजी-पोळीचे जेवणही मिळणार आहे. प्रवासातील नागरिकांना आयआरटीसीच्या वेबसाईटवरून जेवणाची आर्डर दिल्यानंतर जळगाव स्थानक येईपर्यंत तयार जेवण मिळणार आहे. विशेष म्हणजे पार्सलची सुविधाही देण्यात येणार आहे. दरम्यान, कॅन्टिनवरील इतर पदार्थ व जेवणाचे दर काय असणार, याबाबत सध्या माहिती नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

यापूर्वीचे कॅन्टिन वर्षभरातच बंद :

जळगाव रेल्वे स्थानकावर तीन वर्षांपूर्वी खासगी मक्तेदारामार्फतच प्लॅटफार्म क्रमांक तीनवरच एक कॅन्टिन उभारण्यात आले होते. सुरूवातीला या कॅन्टिनला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, येथील अन्न पदार्थ महागडे असल्यामुळे कालांतराने प्रवाशांनी या कॅन्टिनकडे पाठ फिरवली. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे कॅन्टिन वर्षभरातच बंद पडले होते. तर आता नवीन कॅन्टिनही याच जागेवर उभारण्यात येत आहे.