शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षे उलटले तरी बायोगॅस प्रकल्प मार्गी लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:57 IST

ठेकेदार थांबून प्रकल्प कार्यान्वित करून देत नाही. एकमेकांना ‘खो’ देत प्रकल्प रखडला आहे

ऑनलाईन लोकमत / संजय पाटील अमळनेर, जि. जळगाव, दि. 21 - : शहरातील दररोज निघणा:या घनकच:यावर प्रक्रिया करून खत निर्मितीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबईच्या तंत्रज्ञानावर आधारित (निसर्ग ऋण) बायोगॅस प्रकल्पाचा आराखडा उभारून व ठेकेदाराला 70 टक्के मोबदला देऊनही आठ वर्षांपासून प्रकल्प सुरूच झालेला नाही. नगरपालिकेने 12 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून 33 लाख रुपयांचा बायोगॅस प्रकल्प व एक वषार्साठी देखभाल दुरुस्तीसाठीचा चार लाख 80 हजार रूपयांचा ठेका असा एकूण 37 लाख 80 हजार रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे पाठविला होता. त्यास जिल्हाधिका:यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती. नगरपरिषदेने विवम अॅग्रोटेक औरंगाबाद यांना हे काम दिले होते. मात्र बांधकाम व यंत्रणा उभारताना तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंते यांनी पाहणी न करताच ठेकेदाराला 23 लाख बिल अदा केले. अंबर्षी टेकडीवर हा प्रकल्प उभारण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे यंत्रणा अपूर्णावस्थेत असताना ठेकेदाराने पूर्ण बिलाची मागणी केली.याबाबत न्याय प्रविष्ठ बाब झाली होती. मात्र नंतर न.पा व ठेकेदार यांच्यात समन्वय घडून आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी टाकी उभारून प्रकल्प सुरू करण्याचे ठरले. मात्र प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी लागणारा पाच टन कचरा नगरपालिका उपलब्ध करू शकली नाही. ठेकेदार थांबून प्रकल्प कार्यान्वित करून देत नाही. एकमेकांना ‘खो’ देत प्रकल्प रखडला आहे शहरात हॉटेल, खानावळींचे उरलेले उष्टे अन्न खरगटे, घरातील ओला कचरा, शिळे अन्न, वाया गेलेला भाजीपाला, असा नियोजनानुसार कचरा गोळा केल्यास पाच टन कचरा गोळा होणे शक्य आहे. मात्र कचरा सरसकट चोपडा रस्त्याला उघड्यावर फेकला जातो. त्यामुळे भविष्यात आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे शासनानेही ओला आणि सुका कचरा यांची विभागणी करून त्याची प्रक्रियेद्वारे विघटन करून त्यापासून ऊर्जा, खत निर्मितीचे धोरण राबविणे आवश्यक केले आहे. त्यासाठी नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे.वित्तीय वर्षात प्रकल्प पूर्ण करावा या अटीवर मान्यता मिळालेला प्रकल्प आठ वर्षापासून रखडलेला आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. आता जादा निधी खर्च करून प्रकल्प सुरू करावा अशी आहे.चौकशी करणार - नगराध्यक्षा नागरिकांच्या आरोग्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. मात्र अदा केलेला निधी आणि सध्यपरिस्थिती पाहून चौकशी करून सभेपुढे हा विषय ठेवू. तत्कालीन दोषी कर्मचा:यांवर कारवाई केली जाईल असे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली.प्रकल्प कार्यान्वित करू - मुख्याधिकारीप्रकल्प सुरू करण्यासाठी किमान पाच टन ओला कचरा आवश्यक आहे. कचरा गोळा करणा:या ठेकेदाराकडून कच:याची विभागणी करून बायोगॅस प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल असे मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे यांनी सांगितले.