शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

फसवणूकप्रकरणी अखेर जळगाव येथील कीर्तनकार नाथबाबाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:59 IST

गंडा प्रकरण

ठळक मुद्देमहिलांचा पुन्हा एमआयडीसी पोलिसात गोंधळकीर्तनकारामुळे फुटले नाथबाबाचे बिंग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील कीर्तनकाराने (ह़मु.हनुमाननगर,जळगाव) दोन पैसे मिळतील म्हणून कीर्तनाचे कार्यक्रम सोडून मनोज आधार नाथबाबा बरोबर काम केले.  मात्र नाथबाबाचे कारनामे समोर आल्याने आता कीर्तनकाराने टाळ-मृदंग हाती घेत कीर्तनाला सुरूवात केली आहे. जिह्यातील 2361 महिलांची फसवूणक करणा:या नाथबाबाने कीर्तनकाराच्या गाडीचेही भाडय़ापोटीचे 10 हजार बुडविले आहेत़  पिंप्राळा परिसरातील खंडेराव नगरातील रहिवासी मनपाचा माजी अधिकारी मनोज आधार नाथबाबा याने ऑगस्ट महिन्यात ओपीएम महिला उद्योग नावाने व्यवसाय सुरु केला़ त्याव्दारे महिलांना काम देवून त्यामोबदल्यात पैसे कमविण्याचे आमिष दाखविल़े 25 सीआरपीच्या (कम्युनिटी रिसर्च पर्सन) माध्यमातून भुसावळ, धरणगाव, जामनेर आणि जळगाव अशाप्रकारे जिल्हाभरातील एकूण 2 हजार 361 महिलांकडून एकूण 23 लाखाहून अधिक रक्कम त्याने जमा केली आहे. नाथबाबांच्या जाळ्यात अडकले कीर्तनकार कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी कीर्तनकार जळगावात आले या दरम्यान नाथबाबाने त्याला हेरले. दोन पैसे मिळतील म्हणून कीर्तनकाराने शहरातील नातेवाईक महिलांशी संपर्क साधला़ त्या माध्यमातून नाथबाबाने मेहरुण, रामेश्वर कॉलनी, हनुमाननगर येथील महिलांची साखळी करत पैशांची वसुली केली़ काही दिवस रांगोळी, मसाले मेंकींग असे काम देवून मजूरीही दिली़ नाथबाबावर विश्वास बसल्याने नातेवाईकांनी कीर्तनकाराला शहरातच स्थायिक होण्यास सांगितल़े त्यानुसार किर्तनाचे कार्यक्रम सोडून किर्तनकाराने हनुमाननगरात भाडय़ाची खोली घेतली़ पत्नी व दोन मुलांसह ते स्थायिक झाले. कार्यक्रमाला जाण्यासाठी कार नाथबाबाकडे भाडय़ाने लावली व स्वत: चालक बनल़े एमआयडीसीत गोडावून घेत नाथबाबाने सर्वाचा विश्वासही संपादन केला़ किर्तनकाराच्या भावाला नाथबाबाबद्दल संशय आल्याने नाथबाबाबद्दल माहिती काढली असता बिंग फुटल़ेनाथबाबाविरोधात तक्रारीसाठी मेहरुण, रामेश्वर कॉलनीसह 20 ते 25 महिलांनी एकत्र येत शुक्रवारी पुन्हा दुपारी 12 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाणे गाठल़े मात्र तक्रार द्यायला कुणीही महिला पुढे येत नव्हती़ 2 तासार्पयत तक्रार कोण देणार यावरुन गर्दी केलेल्या महिलांमध्ये तू-तू मै मै वरुन गोंधळ सुरु होता़ पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे, रामकृष्ण पाटील यांनीही महिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचाही नाईलाच झाला़सेना पदाधिकारी पोहोचलेएका महिलेने शिवसेनेच्या शोभाबाई चौधरी यांना प्रकार कळविला़ त्यानुसार त्याही एमआयडीसी पोलीस ठाण्यात आल्या़ सहाय्यक पोलीस निरिक्षक समाधान पाटील या पोलीस ठाण्यासमोर महिलांना कुणीतरी तक्रार द्या, मी गुन्हा दाखल करतो, असे म्हणत होते, मात्र कोणतीही महिला समोर आली नाही़ काही वेळाने शिवसेनेचे शरद तायडे, गणेश सोनवणे, किशोर भोसले यांच्यासह भूषण सोनवणे यांनीही पोलीस ठाण्यात आले व प्रकार जाणून घेतला़चहा प्यायला पैसे नाहीत, महिलांचे पैसे कुठून देवूनाथबाबाला अटक केल्यावर त्याने पैसे घेतल्याबाबत कबुली दिली आह़े सहाय्यक पोलीस निरिक्षक समाधान पाटील यांनी त्याला पैसे परत देण्याबाबत विचारले असता साहेब चहा प्यायला पैसे नाही, महिलांचे पैसे कुठून देवू असे उत्तर दिल़े 2261 महिलांची फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल2261 महिलांकडून 22 लाख 61 हजार रुपये वसूल करुन फसवणूक करणा:या मनोज आधार नाथबाबा विरोधात अखेर शुक्रवारी तुकारामवाडी येथील सुनीता सुनील महाजन या महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा झाला आह़े गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध विभागातील रामकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचा:यांनी त्याला अटक केली़  तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक समाधान पाटील हे करीत आहेत़