शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कमी वयातील पोलिसानंतर आता जिल्ह्यात अव्वल फौजदाराचा बहुमान

By admin | Updated: May 8, 2017 15:43 IST

मुस्तफा मिर्झा याने काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या निकालात खात्यातंर्गत फौजदार परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळविला.

आॅनलाईन लोकमत विशेष   

जळगाव, दि.८ - यशासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो. त्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. कठोर मेहनतीच्या आधारे जिल्हा पोलीस दलात सर्वात कमी वयाचा पोलीस ठरणाºया भडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या मुस्तफा मिर्झा याने काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या निकालात खात्यातंर्गत फौजदार परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळविला.
भडगावसारख्या छोट्या शहरात जन्माला आलेल्या मुस्तफा मिर्झा याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या खात्यातंर्गत स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठले आहे. वडील शकुर बेग मिर्झा अगदी सामान्य ‘फेरीवाला’. दिवसभर कष्ट करून आठवडे बाजारात थांबले. भडगावच्या सैय्यद वाड्यात मातीच्या घरात दोन बहीणी, आई आबेदा, मोठाभाऊ गफुर, अझर आणि सर्वात लहान मुलगा ‘मुस्तफा" अशी या परिवारातील सदस्यांची संख्या. परिस्थितीची जाणीव असल्याने आपल्या आर्थिक ऐपतीनुसारच वडिलांचे आपल्या कुटुंबासाठी छोटे मोठे स्वप्न होते. मात्र आई आबेदा  या जळगावच्या पोलिस लाईनमध्ये वाढलेल्या होत्या. वडील पोलिस जमादार करीम सिराजोद्दीन यांनी गरीबीतही कशा पद्धतीने आपल्या कुटूंबाला घडविले याचे बालकडू त्यांना लहानपणापासून मिळाले होते. काम करुन शिक्षण घेणाºया त्यांच्या मुलांपुढे आजोबांचा आदर्श होता. यासाºयात शिक्षणाची कास धरुन जिल्हा पोलीस दलात रुजू व्हायचे या निश्चयाने मुले प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. प्रयत्नांना यशाची जोड मिळाली अन् तीन पैकी दोन्ही मुलं पोलिसात नोकरीला लागले. त्यात मुस्तफा याला जळगाव जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा पोलीस असल्याचा बहुमान मिळाला. अगदी अठरा वर्षे २ दिवसांचा असतांना त्याने पोलीस भरतीवेळी जिल्हा पोलीस दलाचे कवायत मैदान गाजविले. १६०० मिटर रनिंग मध्ये धावतांनाच तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी मुस्तफाला कवेत घेत त्याचे वय विचारले. ‘अबे इतना छोटा पोलीस" असे आश्चर्यकारक उद्गार त्यांनी मुस्तफाला पाहून काढले होते. हळूहळू गरीबीचे दिवस कमी होत गेले. सुखाचे दिवस आले मात्र ते पाहण्यासाठी वडिल या जगात राहिले नाही. २०१४ मध्ये वडिलांच्या निधनानंतर आई एकटीच घरात होती. मोठा भाऊ नाशकात, मधला भुसावळ बाजारपेठला नियुक्तीला असल्याने मुस्तफाने स्वत: साईड ब्रांच मागून घेतली. नोकरीसह आईची सेवा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. धर्माचरणा प्रमाणे विधवा आईला मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या मक्का मदिना येथे ‘हज’ यात्रेसाठी स्वत: घेवून जात त्याने जबाबदार मुलाचे कर्तव्य पूर्ण केले.  २१ आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक २३ हजार २४३ परिक्षार्थींनी परीक्षा दिली. जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी असलेल्या मुस्तफाने कमी वयाच्या पोलीस या बहुमानासोबत खात्यातंर्गत उपनिरीक्षक परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून पहिला तर राज्यातून २३ वा येण्याचा दुसरा बहुमान पटकावला.