शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

17 वर्षानंतर अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र रद्द

By admin | Updated: April 1, 2017 00:53 IST

फटका : टिश्यू कल्चर केळी संशोधन केंद्र व कृषी अवजार केंद्राचे काम बंद

जळगाव : तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तब्बल 17 वर्षानंतर शासनाने रद्द केले आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयांचीदेखील तरतूद केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 1999 मध्ये वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले होते. त्यासाठी 106 एकर जागादेखील देण्यात आली होती. या कामासाठी 10 लाखांचा निधीदेखील खर्च झाला होता. मात्र आता हे काम टेंडरप्रक्रियेत असताना शासनाकडून अचानक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम रद्द करण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ते जळगावात व्हावे की धुळ्यात यावरून मतभेद होते. त्यामुळे यासाठी एका समितीची शासनाने नियुक्ती केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून विद्यापीठ गरजेचे असल्याचे या समितीचे मत आहे. मात्र त्यानंतरही कृषी विद्यापीठाचे काम थांबले आहे. तसेच भुसावळ-जामनेर रस्त्यावरील आयटीआयजवळ पाच एकर जागेत उभारण्यात येणा:या कुक्कुट संशोधन प्रकल्पदेखील शासनाने रद्द केला आहे. हे प्रकल्प तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे.पाल येथे उद्यान विद्या महाविद्यालयासाठी 100 एकर जागा मंजूर केली आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी शिवारातील 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी शासनाने जागा दिली आहे. तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम अर्थमंत्र्यांनी एका वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील भाषणावेळी दिले होते, मात्र या अर्थसंकल्पात एक रुपयांच्या निधीचीदेखील तरतूद यासाठी केलेली नाही.चोपडय़ासाठीचा  निधी आलाच नाहीचोपडा तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला होता. तसेच चोपडा येथे अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी शासकीय आयटीआयसाठी 4 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्यापैकी एक रुपयादेखील शासनाकडून मिळालेला नाही. मुक्ताईनगरात अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी पॉलिटेक्नीक कॉलेज मंजूर झाले आहे. त्यासाठी जागादेखील देण्यात आली आहे. मात्र हे काम आता थंडबस्त्यात आहे. यासोबत बोदवड तालुक्यातील नाडगाव-आमदगाव शिवारात मंजूर असलेले तूर संशोधन केंद्राचे कामदेखील थांबले आहे.