शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पाणी भरताना विद्युत पंपाचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:00 IST

पवार यांचे हरिविठ्ठल नगराच्या थांब्याजवळ सलून दुकान आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : नळाला आलेले पाणी भरत असतांना विद्युत प्रवाह उतरलेल्या विद्युत पंपाचा धक्का लागल्याने प्रकाश रामधन पवार (५६) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता हरिविठ्ठल नगरात घडली. पवार यांचे हरिविठ्ठल नगराच्या थांब्याजवळ सलून दुकान आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जुना आठवडे बाजार परिसरात प्रकाश पवार हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. पत्नी धुणीभांडीचे काम करत असल्याने त्या कामासाठी गेलेल्या होत्या. घरी पवार तसेच त्यांची वृध्द आई असे दोघेच होते. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी ११.३० वाजता पाण्याचा पुरवठा झाला, त्यामुळे पवार यांनी पाणी भरण्यासाठी विद्युत पंप सुरु केला. काही मिनिटातच या पंपातून नळी निसटली. ती पुन्हा लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. शेजा‍-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच याच परिसरात राहणारे भाऊ राजेंद्र पवार यांनी घटनास्थळ गाठले व त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.जामनेर तालुक्यातील भराडी येथील मुळ रहिवाशी असलेले प्रकाश  पवार हे गेल्या १२ वर्षापासून हरिविठ्ठल नगरात जुना आठवडे बाजार परिसरात स्थायिक झाले होते. त्यांचे हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्या पश्‍चात आई सखुबाई, पत्नी शालीनी, मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा त्यांचा परिवार आहे. शुभम हा पुण्याला वास्तव्यास आहे.