शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड.प्रकाश साळसिंगीकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:26 IST

लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देएका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये केलेल्या कार्याची घेतली दखलमुंबईला हादरवून टाकणाऱ्या अनेक खटल्यांमध्ये केला प्रभावी युक्तीवाद

यावल, जि.जळगाव : लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एका तपाहून अधिक काळ मुंबईसह राज्यभरातील न्यायालयांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.भुसावळचे सुपुत्र असलेल्या अ‍ॅड.प्रकाश साळसिंगीकर यांनी भुसावळमधील नहाटा कॉलेजमधून २००२मध्ये वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. त्यानंतर वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६ पासून खºया अर्थाने त्यांनी गुन्हेगारी विभागामध्ये आपल्या वकिलीला सुरुवात केली. मुंबईला हादरवून टाकणारे शक्ती मील सामूहिक बलात्कार प्रकरण, बेस्ट बेकरी खटला, अदनान पत्रावाला हत्या, कुरार व्हिलेज हत्याकांड, आयटी क्षेत्रातील तरुणी इस्थर अनुह्या हत्याकांड आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर मर्डर केस अशा हायप्रोफाईल केसेससह अनेक खटल्यांमध्ये प्रभावीपणे युक्तिवाद करुन वकिलीच्या क्षेत्रात अ‍ॅड. साळसिंगीकर यांनी आपला ठसा उमटवला आहे.खान्देशचे सुपुत्र अ‍ॅड.उज्जवल निकम यांनी फौजदारी खटल्यात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविल्यानंतर अ‍ॅड.साळशिंगीकर यांना मिळालेला बहुमान हा मानाचा तुराच आहे.मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हेशाखेकडे दाखल होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांच्या केसेस, तसेच एमपीआयडी केसेमध्ये शासनाने अ‍ॅड. साळसिंगीकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. अनेक प्रसारमाध्यमांतून अ‍ॅड. साळसिंगीकर यांनी कायदेतज्ज्ञ म्हणून उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या विधी आणि न्याय मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयYawalयावल