शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'नॅक'समिती विद्यापीठात दाखल; शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण

By सागर दुबे | Updated: August 23, 2022 18:41 IST

नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून मंगळवारी सकाळी ही टीम विद्यापीठात दाखल झाली.

सागर दुबे

जळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला सामोरे जात असून  आज मंगळवार, २३ रोजी नॅक पिअर टीम विद्यापीठात दाखल झाली असून मंगळवारी कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले तर दुपारच्या सत्रात सर्व प्रशाळांच्या संचालकांनी शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले.  

नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून मंगळवारी सकाळी ही टीम विद्यापीठात दाखल झाली.  या पिअर टीममध्ये  चेअरमन  आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. दिलीप चंद्रा नाथ,  सदस्य समन्वयक प्रा. प्रशांत कुमार (बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी), सदस्य प्रा. के. जयप्रसाद (केंद्रीय विद्यापीठ, कसारागोड, केरळ), प्रा. अभय आनंद बौराई (हेमवती नंदन बहुगुणा, गढवाल, केंद्रीय विद्यापीठ, उत्तराखंड) यांचा समावेश आहे.  सकाळी विद्यापीठाच्या गांधी टेकडीवर या समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.  

अहवालाच्या निकष निहाय सादरीकरणप्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी समितीसमोर विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे सादरीकरण प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. स्वयंमूल्यांकन अहवालाच्या निकष निहाय सादरीकरण प्रा.व्ही.व्ही. गिते, प्रा.जयदीप साळी, प्रा.भूषण चौधरी, प्रा.सतीश कोल्हे, प्रा.अजय सुरवाडे, प्रा.मनीष जोशी, प्रा.प्रवीण पुराणिक यांनी केले. विद्यापीठाच्या विश्रामगृहावर व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत समितीने संवाद साधला.  या संवादाच्या वेळी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.एन.के.ठाकरे व माजी कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे देखील उपस्थित होते.  

संचालकांशी साधला संवाददुपारच्या सत्रात विद्यापीठाच्या विविध प्रशाळांच्या संचालकांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले.  सायंकाळी या समितीने विद्यापीठ क्रीडा संकुलाला भेट दिली. सायंकाळी उशिरा विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.