शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींवर नियुक्त होणार प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:10 IST

भुसावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे.

ठळक मुद्देप्रशासनातर्फे तयारी सुरू१२ अधिकाऱ्यांची होणार नियुक्तीएका अधिकाºयाकडे दोनपेक्षा जास्त ग्रामपंचायती

उत्तम काळेभुसावळ : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी नियोजन केले आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मान्यता घेऊन यादी प्रसिद्ध होण्याचे संकेत देण्यात आले आहे. २६ ग्रामपंचायतीवर १२ अधिकाऱ्यांंच्या नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे दोनपेक्षा जास्त ग्रामपंचायती येणार आहे.मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे सार्वत्रिक निवडणुकांना होऊ न शकलेल्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा प्रशासनपदी योग्य व्यक्तीची निवड करण्यात यावी यासाठी शासनाने अतोनात प्रयत्न केले. मात्र न्यायालयाच्या आदेशाने विस्तार अधिकाºयाच्या वरच्या दर्जाचे प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.या ग्रामपंचायतीची १२ पासून संपणार मुदततालुक्यातील कुºहे (पानाचे), किन्ही, कंडारी, खंडाळा, मन्यारखेडा, काहुरखेडा या ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे.फेकरी ग्रामपंचायतींची मुदत १३ रोजी संपत आहे.साकरी, टहाकळी, पिंपळगाव बुद्रूक, जोगलखेडा, जाडगाव, कठोरा बुद्रूक व साकेगाव या ग्रामपंचायतींची मुदत १४ रोजी संपत आहे.बोहर्डी बुद्रूक, पिंपरीसेकम, आचेगाव, हतनूर, बेलव्हाय, सुसरी या ग्रामपंचायतीची मुदत १६ रोजी संपत आहे.वांजोळा, कठोरा खुर्द, शिंदी या ग्रामपंचायतीची मुदत १८ रोजी संपत आहे.खडका, मांडवे दिगर या ग्रामपंचायतीची मुदत २० रोजी संपत आहे, तर ४ आॅक्टोबर रोजी दर्यापूर या ग्रामपंचायतीचे मुदत संपत आहे.या अधिकाºयांची होणार निवडदरम्यान, येथील पंचायत समितीने २६ ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकाºयांसह शाखा अभियंता, कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा १२ अधिकाºयांच्या नावांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. त्या ग्रा.पं.विस्तार अधिकारी यादीत उमेश पाटणकर, शाखा अभियंता गणेश ठाकूर, शाखा अभियंता सचिन बडगे, एल.डी.ओ. विस्तार अधिकारी सलीम बशीर तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी किशोर तायडे, कृषी विस्तार अधिकारी कपिल सुरवाडे, कृषी विस्तार अधिकारी सुनील दांडगे, विस्तार अधिकारी सांख्यिकी अनिल सुरडकर, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम धाडी, कृषी अधिकारी प्रभाकर मोरे, आरोग्य विस्ताराधिकारी संजय विसपुते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhusawalभुसावळ