शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात प्रशासन अधिकारी रुजू होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार नुकताच नंदुरबारच्या माध्यमिक सहायक शिक्षण उपनिरीक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार नुकताच नंदुरबारच्या माध्यमिक सहायक शिक्षण उपनिरीक्षक यांच्याकडे तात्पुरता स्वरूपात सोपविण्‍यात आला आहे. दरम्यान, नियुक्ती आदेश काढून दहा दिवस उलटूनसुद्धा प्रशासन अधिकारी रुजू झाले नाहीत. उलट ही तात्पुरती स्वरूपाची नियुक्ती रद्द करण्‍यासाठी त्यांनी उपसंचालकांकडे अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

डी. टी. ठाकूर यांच्याकडे भुसावळ नगर परिषद प्रशासन अधिकारी पदाच्या कार्यभारासोबत सावदा, अमळनेर व जळगाव शिक्षण मंडळाचासुद्धा अतिरिक्त कार्यभार होता. नुकतेच २८ फ्रेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जळगाव मनपा शिक्षण मंडळाचा पदभार हा जळगाव माध्‍यमिक शिक्षण विभागातील सहायक शिक्षण उपनिरीक्षक आर. एल. माळी यांच्याकडे सोपविण्‍यात आला होता, पण ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. परिणामी, गेल्या एक महिन्यापासून प्रशासन अधिकारी नसल्यामुळे शिक्षक व सेवानिवृत्तांचे पगार, बिले थांबून असून शिक्षण मंडळाची घडी विस्कटली आहे.

उपसंचालकांनी सोपविला तात्पुरता पदभार

नाशिक शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी भुसावळ, सावदा, अमळनेर, जळगाव शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदावर तात्पुरत्या नियुक्या केल्या आहेत. भुसावळ व सावदा नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार हा धुळ्याचे डी. बी. माळी यांच्याकडे सोपविला आहे. अमळनेर शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी पदावर नंदुरबार येथील सी. डी. पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसेच जळगाव शिक्षण मंडळावर तात्पुरत्या स्वरूपाचे प्रशासन अधिकारी म्हणून नंदुरबार माध्‍यमिक शिक्षण विभागातील आर. बी. पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविण्‍यात आला आहे. हे नियुक्ती आदेश २६ मार्च रोजी काढण्‍यात आले आहेत.

पदभार स्वीकारण्यास असमर्थता?

दरम्यान, नंदुरबार माध्‍यमिक सहायक शिक्षण उपनिरीक्षक आर. बी. पाटील यांनी जळगाव मनपा शिक्षण मंडळाचा पदभार स्वीकारण्‍यास अमसर्थता दर्शविली असल्याची माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांकडून मिळाली. विशेष म्हणजे, ही नियुक्ती रद्द व्हावी म्हणून उपसंचालकांकडे अर्जदेखील केला आहे. महिनाभरापासून प्रशासन अधिकारी नसल्यामुळे शिक्षण मंडळातील कामकाज कासवगतीने सुरू आहे. कोरोना काळ सुरू असताना सेवानिवृत्तांना हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, या नियुक्तीसंदर्भाबाबत ‘लोकमत’ने नाशिक शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.