शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी काय व्यवस्था हवी, नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचना मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.

महापौरांनी केल्या सूचना

लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रसार माध्यमातून देखील तसे वृत्त प्रकाशित झाले आहे. लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही याबाबत दर्शनी भागात फलक लावावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी ग्रीन नेट किंवा मंडप टाकावे, बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, मनुष्यबळ वाढवावे, नियोजन ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास प्रत्येक लसीकरण केंद्रावर २ महिला, २ पुरुष सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात लसीकरण केंद्रे वाढवा

शहरातील पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांना अनुसरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या.

पॉझिटिव्ह रुग्णांचा १०० टक्के शोध घ्या

जळगाव शहरात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णांचा शोध घ्यावा आणि जे नियम मोडतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. दररोज १०० टक्के रुग्ण शोधले जायला हवे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम पुढील १५ दिवसांत पार पाडण्यात यावी, अशा सूचनादेखील महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.