शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

थेट शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा करा

By admin | Updated: April 17, 2017 00:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील : नारायण राणे यांनी अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करायला हवे

चंद्रकांत जाधव, जळगावकर्जमाफी दिली, पण तिचा लाभ शेतकºयांना न होता राज्यातील सहकारी बँकांना झाला असे सांगून शेतकºयांना मदतच न करण्याचा वेळकाढूपणा सरकार करीत आहे. पण सरकारला राज्यातील सहकारी बँकांबाबत आक्षेप असेल तर शेतकºयांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करा. कर्जमाफीऐवजी ही थेट मदत शेतकºयांना मोलाची ठरेल, असे मत राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी व्यक्त केले. विरोधकांतर्फे आयोजित शेतकरी संघर्ष यात्रा जिल्ह्यात आली असता ‘लोकमत’ने विखेपाटील यांच्याशी संवाद साधला... त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरुपात असा़

प्रश्न - उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे दर मिळत नाहीत. स्वामिनाथन आयोगाचा मुद्दाही मागे पडला. याविषयी काय सांगाल?विखे पाटील - लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर आधारित दरांचा मुद्दा मांडला. नंतर राज्य सरकारमधील मंडळीनेही निवडणुकीच्या प्रचारात हाच मुद्दा घेतला. पण केंद्रात तीन वर्षे झाली व राज्यात सव्वादोन वर्षे झाली, अजून उत्पादन खर्चावर आधारित दर शेतमालास नाहीत. आमच्या सरकारने १४० टक्के हमीभाव वाढविले. कृषी मूल्य आयोगाला शेतमाल दरवाढीच्या शिफारसी सरकार करीत नाही. कोरडवाहू शेतकºयांचे ८० टक्के उत्पन्न घटले. तूर खरेदी केंद्रांवर बारदानचा प्रश्न पुढे आले. व्यापाºयांनी शेतकºयांची मोठी लूट केली. हे नकारात्मक सरकार आहे. प्रश्न - नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या, त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उठत आहेत, यावर काय सांगाल?विखे पाटील - नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्या बातम्या येतात त्यावर राणे यांनी खुलासा केला. पण अडचणीच्या काळात राणे यांनी काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. प्रश्न - संघर्ष यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला. संघर्ष यात्रेनंतरही कर्जमाफी झाली नाही तर पुढे काय भूमिका असेल?विखे पाटील - शेतकरी संघर्ष यात्रेतून कर्जमाफी व इतर मुद्द्यांबाबत आम्ही मोठी जागरूकता निर्माण करू शकलो. अनेक जण यात जुळले. अधिवेशनात सतत १० दिवस हा मुद्दा आम्ही मांडला. सरकार अल्पमतात आले असते म्हणून सरकारने १९ आमदार निलंबित केले. कारण शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमच्यासोबत होती. पण आमदारांचे निलंबन केले... म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी करून गुन्हा केला का? पण या यात्रेमुळे सरकारवर दबाव वाढला. मुख्यमंत्री शेतकºयांशी संवाद साधू लागले आहे. सरकारने बँकांकडून लाखभर कर्जाची माहिती मागविली आहे. प्रश्न - संयुक्त पुरोगामी सरकारच्या २००८ च्या कर्जमाफीनंतरही आत्महत्या झाल्या. आता कर्जमाफी केली तर पुढे आत्महत्या होणार नाहीत याची शाश्वती देता येईल का?विखे पाटील - संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर आत्महत्यांचे प्रमाण ८० टक्के घटले. शेतकºयांना                        त्या कर्जमाफीचा लाभ झाला. पण मध्यंतरी तीन वर्षे दुष्काळ पडला... शेतमालाबाबात फारसे दर नव्हते. यामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या. कर्जमाफी आम्हीही नेहमी                मागत नाहीत. सरसकट कर्जमाफी करायला हवी.

 

खडसेंनी आग्रह केल्याने चहा घ्यायला गेलो...राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, एकनाथराव खडसे व आम्ही अनेक वर्षे सोबत सभागृहामध्ये आहोत. त्यांच्याशी जी भेट मुक्ताईनगरात झाली ती औपचारिक होती. आम्ही मुक्ताईनगरात येणार होतो. खडसे यांनी चहा घ्यायला या.., असा आग्रह केला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. पण भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. राजकारणाच्या जागी राजकारण व मैत्रीच्या जागी मैत्री आहे. उत्तर प्रदेशात कर्जमाफी शेतकºयांना झाली.                             राज्यात नेमक्या काय अडचणी आहेत?विखे पाटील म्हणाले, मूळाचत या सरकारची इच्छाशक्ती नाही. शेतकरी हा सरकारच्या अजेंड्यावर नाही. दुष्काळाचा फटका बसला. नंतर जलयुक्त शिवार योजना सरकारने आणली, पण आमच्या सरकारच्या काळात आम्ही महात्मा फुले यांच्या नावाने ही योजना चालवित होतो. फक्त नाव बदलून जलयुक्त शिवाय योजना आणली. जलयुक्त शिवाय योजनेत त्रुटी आहेत.             ८० टक्के क्षेत्र राज्यात कोरडवाहू आहे. त्या दृष्टीने धोरण हवे.