अग्नीशामक दलात कर्मचाऱ्यांचा अभाव :-मनपाचे शहरात तीन ठिकाणी अग्नीशामक केंद्र असून, या तिन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. एक केंद्रात किमान २५ कर्मचारी गरजेचे असतांना, या प्रत्येकी केंद्रामध्ये १७ कर्मचारी आहेत.
-अपुऱ्या मनुष्यबळा अभावी शहरात आगीची घटना घडल्या या विभागाला इतर विभागातील कर्मचाऱ्याची मदत घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येते, त्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्याबाबत कुठलेही प्रशिक्षण देण्यात आले नसल्यामुळे, त्यांची आग विझविण्यात कुठलिही मोलाची मदत नसते.
इन्फो :
वर्षभरात आगीच्या १५२ घटना :
जळगाव शहर व परिसरात आगीच्या घटना उद्भवल्यावर या ठिकाणी मनपाच्या अग्नीशमन विभागातर्फेच आगींवर नियंत्रण मिळविण्यात येते. त्यानुसार जळगाव शहरात वर्षभरात १५२ आगीच्या घटना घडल्याचे अग्नीशमन विभागातर्फे सांगण्यात आले.