शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीआय’च्या दोषारोपपत्रात नाव येईल ‘त्या’ अधिका:यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 01:12 IST

नोटा बदली प्रकरणी एकनाथराव खडसे यांची पत्रपरिषदेत माहिती : 210 कोटींच्या जुन्या नोटा पडून

जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतील नोटा बदली प्रकरणी सीबीआय चौकशी झाली. यात बॅँकेतील काही अधिका:यांची चौकशी झाली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रश्नी अद्याप चौकशी सुरू असून दोषारोपत्रामध्ये त्यांचे नाव येईल त्या अधिकारी व कर्मचा:यावर  जिल्हा बॅँक कारवाई करेल असे माजी मंत्री तथा जिल्हा बॅँकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतून 73 लाख 32 हजाराच्या  जुन्या 500 व हजाराच्या नोटा बदली प्रकरणी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, बॅँकेचे चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा बँकेत सीबीआयने केली होती चौकशीयात गेल्या 2 मार्चला सीबीआयच्या पथकाने येथे मुक्काम ठोकून जळगावची मुख्य शाखा तसेच चोपडा शाखेत जाऊन अधिका:यांची कसून चौकशी केली होती. यानंतरही सीबीआय पथकाने जळगावी येऊन तसेच बॅँकेच्या अधिका:यांना मुंबईत बोलावून चौकशी केली आहे. तसेच नंतरही जिल्हा बँकेशी संबंधितांचे जबाब सीबीआयने घेतले आहेत. नाबार्ड, राज्य शासनाला विनंती करणारबॅँकेला आगामी काळात मोठय़ा प्रमाणात खरीप कर्ज वितरित करावयाचे आहे मात्र वसुली कमी आहे. अशा परिस्थितीत वसुलीवर भर देण्यात येणार असल्याचे खडसे म्हणाले. तसेच नाबार्ड व राज्य शासनाला क्रेडिट वाढवून देण्याबाबत  व आर्थिक मदत मिळावी असा प्रस्ताव  दिला जाईल. राज्यातील बहुतांश बॅँकांपुढे ही समस्या असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. बॅँक आर्थिक अडचणीत नाहीराज्यातील 10 जिल्हा बॅँका पुन्हा अडचणीत आल्या आहेत. जिल्हा बॅँकेची याबाबत परिस्थिती काय, असे विचारले असता खडसे म्हणाले, 9 टक्क्याच्या आत ज्या बॅँकांचा सीआरआर आहे त्या अडचणीत आल्या आहेत. सुदैवाने आपल्या बॅँकेचा सीआरआर 9 टक्क्यांवर  आहे. त्यामुळे अडचणीतील या बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचा समावेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेत 210 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा पडूनजुन्या नोटा बदलीच्या काळात जिल्हा बॅँकेने 210 कोटींच्या नोटा बदलून दिल्या. त्या अद्यापही बँकेत पडून आहेत. यामुळे बॅँकेचा एवढा पैसा अडकून पडला आहे.  जिल्हा बॅँकेवरील र्निबध हटविले असले                  तरी त्याबाबतचे परिपत्रक केंद्राने काढलेले नाही. हे आदेश                        निघाल्यावर बॅँकेचे 210 कोटींबाबत निर्णय होईल, त्यामुळे त्या                 आदेशांची प्रतीक्षा असल्याचेही खडसे म्हणाले. सीबीआयच्या पथकाने बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व चोपडा शाखेतील दोघा अधिका:यांची नोटा बदली करून दिल्या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला याबाबत बॅँकेने अद्याप कुणावरही कारवाई केली नसल्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, बॅँकेच्या अधिका:यांची यात चौकशी झाली व अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. चौकशी सुरू असल्यामुळे त्याबाबत जास्त बोलणे उचित होणार नाही. चौकशी सुरू असताना कुणावर बॅँकेने कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. याप्रश्नी दोषारोपपत्रात ज्याचे नाव येईल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.