शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय चार्जशिटमध्ये नाव येईल त्याच्यावर कारवाई

By admin | Updated: April 3, 2017 16:29 IST

चोपडा शाखेतील नोटबदली प्रकरणात सीबीआयने चाजर्शिट दाखल केल्यानंतर त्यात ज्या अधिकारी व कर्मचा:यांचे नाव येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

 एकनाथराव खडसे : आताच निर्णय घेणे अन्याय ठरेल

जळगाव, दि.3- जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतील नोटा बदल प्रकरणी सीबीआय चौकशी झाली. यात बॅँकेतील काही अधिका:यांची चौकशी व गुन्हा दाखल झाला. याप्रश्नी अद्याप चौकशी सुरू असून चार्जशिटमध्ये ज्यांचे नाव येईल त्या अधिका:यावर बॅँक कारवाई करेल असे माजी मंत्री तथा जिल्हा बॅँकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 
जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतून 73 लाख 32 हजाराच्या  जुन्या 500 व हजाराच्या नोटा बदली प्रकरणी बॅँकेचे व्यवस्थापकी संचालक जितेंद्र देशमुख, बॅँकेचे चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरुद्ध सीबीआयने फसवणूक व लाचलुचपत विषयक गुन्हा दाखल केला आहे. यात गेल्या 2 मार्चला सीबीआयच्या पथकाने येथे मुक्काम ठोकून जळगावची मुख्य शाखा तसेच चोपडा शाखेत जाऊन अधिका:यांची कसून चौकशी केली होती. यानंतरही सीबीआय पथकाने जळगावी येऊन तसेच बॅँकेच्या अधिका:यांना मुंबईत बोलावून चौकशी केली आहे. 
चौकशी सुरू आहे
सीबीआयच्या पथकाने बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व चोपडा शाखेतील दोघा अधिका:यांची नोटा बदली करून दिल्या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला याबाबत बॅँकेने अद्याप कुणावरही कारवाई केली नसल्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, बॅँकेच्या अधिका:यांची यात चौकशी झाली व अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. चौकशी सुरू असल्यामुळे त्याबाबत जास्त बोलणे उचित होणार नाही. चौकशी सुरू असताना एकदम कुणावर बॅँकेने कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. याप्रश्नी चार्जशिटमध्ये ज्याचे नाव येईल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बॅँक अडचणीत नाही
राज्यातील 10 जिल्हा बॅँका पुन्हा अडचणीत आल्या आहेत. जिल्हा बॅँकेची याबाबत परिस्थिती काय, असे विचारले असता खडसे म्हणाले, 9 टक्क्याच्या आत ज्या बॅँकांचा सीआरआर आहे त्या अडचणीत आल्या आहेत. सुदैवाने आपल्या बॅँकेचा सीआरआर 9 टक्क्यांवर  आहे. त्यामुळे अडचणीतील या बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचा समावेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.