शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्या ८० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी कोरोना वर मात करून ते पुन्हा कामावर रुजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी कोरोना वर मात करून ते पुन्हा कामावर रुजू झाले असून, उपायुक्त पुन्हा त्याच ॲक्शन मोडमध्ये शुक्रवारी दिसून आले. शहरातील विविध भागात फिरून मास्क न घालणाऱ्या ८० जणांवर उपायुक्तांनी कारवाई केली आहे. यासह गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहाचा वापर स्वयंपाकगृहासाठी झाल्याचे उघड झाल्यानंतर गुरुवारी उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमध्ये जाऊन त्या स्वच्छतागृहाची ही पाहणी केली.

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित असल्याने उपचारासाठी घरीच थांबले होते. कोरोना वर मात करून उपायुक्त पुन्हा महापालिकेत रुजू झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमध्ये जाऊन स्वच्छतागृहात नाश्त्याचे पदार्थ तयार करण्याचा प्रकार घडल्यानंतर या स्वच्छतागृहाची पाहणी केली. गुरुवारी पाहणीच्या दरम्यान संबंधित विक्रेत्याने स्वच्छतागृहांमध्ये लावण्यात आलेले किचन व सर्व सामान काढून घेतल्याचे लक्षात आले. यानंतर उपायुक्तांनी या ठिकाणावरून ज्या दुकानांमध्ये नाश्ताचा माल जात होता. त्याठिकाणी जाऊन माल न घेण्याच्या सूचना दिल्या. यासह संबंधित विक्रेत्यांवर ही कारवाईचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. यासह उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमधील सर्व स्वच्छतागृहांची देखील पाहणी केली.

मास्क न घालणारे रडारवर

उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फुले मार्केट, टॉवर चौक , सुभाष चौक परिसर, दाणा बाजार परिसर या भागात जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान मास्क न घालणार्यांवर उपायुक्तांनी कारवाई केली. ८० नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंडाची आकारणी देखील करण्यात आली आहे. यासह बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड या भागात भाजीपाला विक्री करणार्‍यांवर देखील महापालिका उपायुक्तांनी कारवाई केली आहे.