भुसावळ, जि. जळगाव, दि. 22 - बेकायदेशीररित्या देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणा:यांविरुद्ध सलग दुस:या दिवशी शनिवारी शहर व बाजारपेठ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली़शहर पोलीस ठाणे हद्दीतील यावल नाक्याजवळील भिलवाडी येथे ज्योती संदीप महाजन (48) या महिलेच्या ताब्यातून 525 रुपये किंमतीची सात लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली़ या प्रकरणी विजया घेटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ दुसरी कारवाई बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली़ आशिया महामार्ग क्रमांक 46 वरील लक्झरी बसस्थानकाजवळ संशयित आरोपी मनीष मोहनलाल गोग्या याच्या ताब्यातून चार हजार 320 रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आल़ेत्यात 850 रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या, एक हजार रुपये किंमतीची विदेशी दारू तसेच दोन हजार 480 रुपये किंमतीच्या बीअर जप्त करण्यात आल्या़
भुसावळ येथे बेकायदा मद्य विक्री करणा:यांवर कारवाई
By admin | Updated: April 22, 2017 17:58 IST