शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग.स.चे माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यावर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मळगाव शाळेचे शिक्षक विलास यादवराव नेरकर यांची योग्य ती चौकशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मळगाव शाळेचे शिक्षक विलास यादवराव नेरकर यांची योग्य ती चौकशी व त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश नुकतेच प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांनी दिले आहेत. त्यासोबतच कार्यवाहीचा अहवाल तात्काळ शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही भडगाव गटशिक्षणाधिकारी यांना देण्‍यात आल्या आहेत.

पोलिसात आहे गुन्हा दाखल...

ग.स.सोसायटीतील लिपिक विजय प्रकाशराव पाटील यांना नियमित वेतन श्रेणीचा कोणताही आदेश देण्यात आलेला नसतांना तत्कालीन अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालिन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे यांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे विलास पाटील यांच्या नियमित श्रेणी आदेशावर तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर हे अध्यक्ष नसताना बनावट आदेशावर सह्या केल्या, त्यामुळे ही संस्थेची फसवणूक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ग.स.सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नेरकर, ठाकरे यांच्याविरूध्द ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीईओंना पाठविले पत्र...

विलास नेरकर हे भडगाव तालुक्यातील मळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून आहेत. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मार्च महिन्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून नेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत कळविले होते तसेच तपास सुरू असल्याचे पत्रात म्हटले होते.

काय म्हटले आहे आदेशात...

दरम्यान, नुकतचे प्राथमिक शिक्षण विभागाने ग.स.सोसायटी तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश काढलेले आहेत. शिक्षक विलास नेरकर हे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याने तसेच सदर प्रकरणी कारवाईचे आदेश गटस्तरावर असल्याने आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी व कारवाई करून, या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पत्र भडगाव गटशिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. तसेच चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्‍यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी बी.एस.अकलाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.