शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

भुसावळात मालेगाव पॅटर्न काढ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:23 IST

मालेगाव पॅटर्न युनानी काढ्याच्या निर्मिती फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.

ठळक मुद्देदोन लाखांचा मुद्देमाल जप्तकोरोनाची भीती अन् काढ्याच्या मागणीत झाली वाढ

भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या अयान कॉलनीतील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या मालेगाव पॅटर्न युनानी काढ्याच्या निर्मिती फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. यात एक लाख दोन हजार रुपयांचा माल (काढा) व ८५ हजार रुपयांच्या दोन मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल सहा तास कारवाई करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांच्या मालकीचा हा कारखाना आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.कोरोना आजारावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते मुन्ना तेली यांनी करून प्रथम युनानी काढ्याची विक्री केली. त्यानंतर लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता अयान कॉलनीतील मॉडर्न शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन मशनरी आणून एका खोलीमध्ये हा काढा बनवण्याची फॅक्टरी सुरू केली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ही फॅक्टरी सुरू असल्याचे समजते. यासंदर्भात ही फॅक्टरी बेकायदेशीर असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी येथील एका नागरिकाने केली. त्यामुळे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक तथा जळगाव येथील कार्यालयाचे प्रभारी सहायक आयुक्त शां. ना. साळवे , जळगाव येथील निरीक्षक ए. एम. माणिकराव, जळगाव जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी साळवे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून कारवाई केली.दरम्यान, कोरोनामुळे शहरात नव्हे तर जगात नागरिक भयभीत झाले आहे. या संसर्गापासून वाचण्यासाठी काढा मिळत असल्याचे पाहून केवळ शहरातच नव्हे तर राज्यात, मध्य प्रदेश व गुजरात येथेही या काढायची मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या काढायचे मोठ्या प्रमाणात विक्री झाली असल्याचे दिसून आले.पैशांसाठी नव्हे तर जनसेवेसाठी निर्मितीजनतेच्या सेवेसाठी हा काढा विकण्यात येत होता, अशी प्रतिक्रिया न. पा. गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागBhusawalभुसावळ