ऑनलाइन लोकमतभुसावळ , जळगाव, दि. 18 - महिलांच्या डब्यात घुसखोरी करणा:या 72 प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाने गुरुवारी कारवाई केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली़विभागीय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही़क़ेलांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज धडक कारवाई केली जात आह़े अप गोवा एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात घुसखोरी करून प्रवास करणा:या 72 प्रवाशांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली़ या प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आल़े अनधिकृत विक्रेते रडारवररेल्वे गाडय़ांमध्ये अनधिकृतरित्या खाद्य पदार्थ विक्री करणा:या दहा विक्रेत्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आल्याची माहिती निरीक्षक लांजीवार यांनी दिली.
महिला डब्यात घुसखोरी करणा:या 72 प्रवाशांवर कारवाई
By admin | Updated: May 18, 2017 13:20 IST