शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार व्यवस्थापनामुळे शिक्षकाचा बळी गेल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:17 IST

निवडणूक प्रशिक्षणात सुविधांचा अभाव

अमळनेर : निवडणूक प्रशिक्षण काळातील शिक्षकाचा गेलेला बळी हा बेजबाबदार व्यवस्थापनामुळे गेल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. उन्हाच्या तीव्रतेचा व मानवी शरीराचा विचार न करता निव्वळ सरकारी काम पार पाडण्याच्या वृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहेभर उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक होत असून मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र निवडणूक पारदर्शी करण्यासाठी फक्त शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांचे तालुके बदलवून त्यांना दुसऱ्या तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमले गेले आहे. मात्र एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात प्रशिक्षण व्यवस्था भिन्न असल्याचे कर्मचाऱ्यांच्या अनुभवास आले असून बेजबाबदार व्यवस्थेमुळेच कळमसºयाचे शिक्षक अंबादास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे.चाळीसगाव येथे शिक्षकांचे प्रशिक्षण पत्र्याच्या गोदामात मंडपाखाली घेण्यात आले पुरेशा पाण्याची व्यवस्था नाही, हवेची व्यवस्था नाही, जेवण व नाश्त्याची सुविधा नाही त्यामुळे ५० ते १०० किमी अंतरावरून आलेले कर्मचारी उन्हाने बेजार झाले. जीव गुदमरल्यासारखा झाला. पाणी नाही , भुकेने व्याकुळ झाल्याने काहींना चक्कर आली. त्यात अंबादास चौधरी हे पायी बसस्टॅण्डकडे परतीला निघाले अन चक्कर येऊन पडताच जागीच मयत झाले. त्याच वेळी अमळनेर येथील प्रशिक्षण हे उन्हाचा विचार करून वातानुकूलित शिवाजी नाट्यगृहात घेण्यात आले. प्रांताधिकारी सिमा आहिरे , तहसीलदार ज्योती देवरे दोन्ही अधिकारी महिला असतानाही कर्मचार्यांना पुरेशा पाण्याची व्यवस्था , भोजन, दोन वेळा मठ्ठा आदी व्यवस्था तसेच रुग्णवाहिकाची सोय करण्यात आली होती तर पाचोरा येथे खुल्या मैदानात मंडपात व्यवस्था करण्यात आली होती. अपूर्ण फॅन व मोजके कुलर यामुळे उष्णता होतीच. पाण्याची व्यवस्था होती पण भोजन नाही तसेच इतर काही ठिकाणी पाणी पुरेसे होते तर भोजन नव्हते त्यामुळे उन्हात लाम्ब अंतरावर जावे लागले , काही ठिकाणी चहाच पाजण्यात आला काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी चार तास प्रशिक्षण देण्यात आले एकाच निवडणुकीत एकाच जिल्ह्यात भिन्न व्यवस्थापनामुळे कर्मचाºयांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यात अधिकारी कायद्याचा बडगा दाखवत असल्याने काहींनी भीती घेतली होती.स्थानिक तालुक्यात नेमणुकीची मागणी२३ एप्रिल पर्यंत उन्हाची तीव्रता वाढणार असून तब्बल १२ तास एकाच खोलीत बसून मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने कर्मचाºयांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने मानवी शरीराची क्षमता ओळखून व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक भारती , माध्यमिक शिक्षक संघ , टी डी एफ संघटनांनी, मुख्याध्यापक संघटनांनी केली असून पुढील निवडणुकात कर्मचाºयांना महसूल कर्मचाºयांप्रमाणेच स्थानिक तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमण्याची मागणीही केली आहे.