शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

पंचांगानुसार पुढच्या काळात दमदार पावसाचा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 22:34 IST

पावसाचे दिलासादायी भाकीत। नक्षत्रांच्या वाहनांनुसार पर्जन्यमानाचा योग

सुहास शूर। जामदा, ता. चाळीसगाव : यंदा पंचांगकर्त्यांनुसार पावसाळ्याचा आरंभ, मध्यान्ह व शेवट या प्रवासात दमदार पावसासह अतिवृष्टीचा योग असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतामान अधिक व आॅगष्टच्या सुरुवातीला पाऊस ओढ देईल, असे पंचांगकर्त्यांना वाटते.दरम्यान, या संपूर्ण प्रवासात पाऊस त्या त्या नक्षत्राच्या वाहनाच्या तालावर नाचणार असल्याचे अर्थात जलवर्षाव करण्याचे संकेत आहेत. त्यानुसार रविवारी सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्रात त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या सोंडेतून धो धो वर्षाव होण्याची शक्यता आहे तर आॅगस्टच्या दुसºया पंधरवड्यात सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आपले वाहन असलेली म्हैस पाण्यात बसण्याच्या योगे अतिवृष्टी संभवते.आश्लेषात मात्र पाऊस ओढ देईल असा अंदाज आहे.पुष्य नक्षत्र : वाहन हत्तीरविवार दि.१९ रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन हत्ती असून गुरु आणि शनी नीर नाडीत आहेत. त्यामुळे या नक्षत्राचा पाऊस दमदार होईल होण्याची शक्यता राहील, असा पंचांगकर्त्यांचा अंदाज आहे. २० ते २४ जुलै, २८ ,२९, ३० जुलै व १ आॅगस्टला पाऊस अपेक्षित आहे .आश्लेषा नक्षत्र : वाहन मेंढाआश्लेषा नक्षत्र २ आॅगस्ट रात्री ९.२८ ला सुरू होते. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून अग्निमांडल योग असल्याने या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल असे दिसते. मात्र नक्षत्राच्या शेवटी पर्जन्यमान सुधारेल. दिनांक २,३,४,१३,१४,१५ आॅगस्ट या दिवशी पाऊस अपेक्षित आहे.मघा नक्षत्र : वाहन म्हैसमघा नक्षत्र १६ आॅगस्ट रविवारी रात्री ७ वाजून ११ मिनिटांनी सुरू होते. वाहन म्हैस असून या नक्षत्रातील पाऊस दिलासा देणारा असेल. काही प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता राहील. दि. १७ ते २१,२७,२८,२९ आॅगस्ट पाऊस अपेक्षित आहे .पूर्वा नक्षत्र : वाहन बेडूक३०आॅगस्ट रविवारी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करतो. वाहन बेडूक आहे. रवी, बुध, शुक्र,शनी जल नाडीत आहेत. सुरुवातीला पाऊस चांगला, पण नंतर कमी पण सर्वदूर होईल. दि. ३०, ३१आॅगस्ट तसेच १ ते ३ ,९ ते ११ सप्टेंबरला पाऊस अपेक्षित आहे . दि.१३ सप्टेंबर रविवारी सकाळी ९वाजून २ मि. सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होते. वाहन मोर असून वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचा पाऊस विखुरला जाऊन काही ठिकाणी चांगली वृष्टी तर काही ठिकाणी वारा सुटून पाऊस निघून जाईल. दि.१३ ते १७,२५ व २६ सप्टेंबर पाऊस अपेक्षित आहे .