जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद गावापासून काही अंतरावर असलेल्या कृषी वैभव नर्सरीजवळ रविवारी रात्री सव्वानऊ वाजता भरधाव अॅपे रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला आहे. नशिराबाद येथील वरची अळी भागातील उदय पांडुरंग गालफाडे (वय-३८) हे एमएच १९ बीपी ३४२७ या दुचाकीवरून रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जात होते. या दरम्यान समोरून येणार्या एमएच १९ व्ही १७५३ या अॅपे रिक्षावरील चालक नितीन घनश्याम बोरोले याने जोरदार धडक दिली. यात उदय गालफाडे हे जागीच ठार झाले. याप्रकरणी प्रमोद प्रल्हाद गालफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक नितीन बारोले याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल आहे. तपास उपनिरीक्षक नगराळे करीत आहेत.
नशिराबादजवळ अपघात, एक ठार
By admin | Updated: May 19, 2014 02:05 IST