शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर येथे 'कोरोना'ला विसरून व्यवहारांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:20 IST

जामनेर येथे कोरोनाला विसरून अनेक ठिकाणी व्यवहारांना गती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर गर्दी कायमकुठे नियमांचे पालन, तर कुठे उल्लंघन

(सैय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या धास्तीमुळे अडीच महिने घरात थांबून असलेले नागरिक आता घराबाहेर पडले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली असली तरी कोरोनाच्या या संकटाला विसरून तालुक्यात व्यवहार सुरू झाले आहेत. तालुक्यात २० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एक-एक रुग्ण संख्या वाढत गेली. शहरात व तालुक्यात कोरोना पोहोचल्याने नागरिकात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यातच तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३९ पर्यंत पोहोचल्याने ही रुग्णसंख्या आणखी वाढते की काय, अशी धास्ती असतानाच अडीच महिन्यापासून आपले व्यवहार बंद ठेवून घरात थांबलेल्या नागरिक, व्यापाऱ्यांनी शहरातील व तालुक्यातील व्यवहार सुरू केले आहेत. यामुळे आता मेन रोड, बिओटी कॉम्प्लेक्स, वाकी रोड, जळगाव रोड, पाचोरा रोड, गांधी चौक, अरफ़ात चौक, श्रीराम मार्केट या भागात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची धास्ती मनात असली तरी अडीच महिन्यांपासून व्यवहार बंद असल्याने उलाढाल थांबली आहे. काम केल्याशिवाय पैसा हातात येणार नाही हे जाणून तालुक्यात व्यवहार पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे.तसेच खरेदी-विक्री, नफा तोटा , या विचारांमध्ये कोरोनाचा काहीसा विसर पडला आहे. त्यामुळे अडीच महिन्यांपासून धास्तावलेली मने पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास तयार झालेले असल्याचे दिसत आहे.नियमांचे पालन करणे आवश्यकबंद झालेले व्यवहार पुन्हा सुरू झाले असून फिजिकल डिस्टिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे.अनेक कामगार घरीतालुक्यातील अनेक नागरिक कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, गुजरात, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते. मार्च आणि एप्रिल महिन्यात या शहरात कोरोनाचा फैलाव वाढला. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. कामे ठप्प झाली. त्यामुळे उपासमार होण्याच्या भीतीने ही मंडळी तालुक्यात दाखल झाली होती. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक असल्याची नोंदी आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे, मुंबई, गुजरात, या भागातील व्यवहारही सुरू झाले आहेत. अनेक कंपन्या पुन्हा सुरू झाल्या. या कंपन्यांना आता कामगारांचा तुटवडा जाणू लागल्याने तालुक्यातील काही कामगारांना कंपन्याकडून बोलावणे येत आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने मजूरवर्ग घरीच थांबले बरं? असे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर