जळगाव : चोपडा तालुक्यातील कठोरा येथील सरला समाधान कोळी (२३) या गर्भवती महिलेला क्षुल्लक कारणावरून चार जणांनी केलेल्या मारहाणीमुळे गर्भपात झाला. १९ ऑगस्ट रोजी सरला यांचा मुलगा अंगणात खेळत होता. जखमी अवस्थेत सरला यांना चोपडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी ३.३0 वाजेच्या सुमारास सरला यांचा गर्भपात झाला. मारहाणीसंदर्भात चोपडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. याबाबत दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सरला यांचे पती समाधान कोळी यांनी केली आहे.सद्य:स्थितीत सरला कोळी या जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. --------- शेजारी राहणारा ईश्वर हा विजेच्या खांबावर आकडा टाकत असताना स्पार्किंग झाले. त्यामुळे सरला व ईश्वर यांच्यात वाद झाला. शाब्दिक वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. शेजारी ईश्वर, त्याची पत्नी, मुलगा व मुलीने सरला यांना मारहाण केली. |