शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज वाहतुकीवर तिसरा डोळा! १ मेपासून वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 17:03 IST

परवान्यांचेही नुतनीकरण रोखणार, राज्य शासनाने गौण खनिजाचे उत्खननन, वाहतूक, देखरेखीसाठी ‘महाखनिज’ ही संगणकीय प्रणाली तयार केली आहे.

कुंदन पाटील

जळगाव - राज्याभरात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना १ मेपासून ‘जीपीएस’प्रणाली (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) सक्तीची केली आहे. त्यामुळे गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच ‘जीपीएस’प्रणाली नसलेल्या वाहनांचा परवान्यांचेही नुतनीकरण रोखण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जीपीएस’प्रणाली सक्तीची करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने गौण खनिजाचे उत्खननन, वाहतूक, देखरेखीसाठी ‘महाखनिज’ ही संगणकीय प्रणाली तयार केली आहे. त्यात ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे या यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच गौण खनिज उत्खननासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे.

३१ एप्रिलची डेडलाईन१ मेपासून जीपीएस प्रणाली नसलेल्या वाहनांना गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी परवाना दिला जाणार नाही. तसेच १ मेपासून खाणपट्टा मंजुरी, नुतनीकरण, परवाना अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ३१ एप्रिलपर्यंत ही प्रणाली स्वीकारावी लागणार आहे.

अन्यथा दंड‘जीपीएस’प्रणालीविना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसुल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८ (८) तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम २०१३ व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.