शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोनशे चौरस फूट घरकुलसाठी वारसदार लपवले; अन न्यायाधीशांनीच गुन्हा दाखल करून आरोपी केले

By संजय पाटील | Updated: February 14, 2023 13:41 IST

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील बाळकृष्ण नथु जोगी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात नऊ वारस होते.

अमळनेर, जि. जळगाव -

न्यायालयात खोटी माहिती पुरवून नऊ पैकी तीनच वारस दाखवून वारस दाखला घेतल्याचे न्यायालयाला उघडकीस आल्याने न्या एस एस अग्रवाल यांच्या आदेशाने जवखेडा येथील तिघांवर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.       अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील बाळकृष्ण नथु जोगी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात नऊ वारस होते. मात्र गावातील  गावठाणातील सि स नंबर ८५ मधील बेघरांसाठी  २०.०९ चौ मी प्लॉट साठी २०२० साली ज्ञानेश्वर बाळकृष्ण जोगी , राजेंद्र बाळकृष्ण जोगी व देवराम बाळकृष्ण जोगी यांनी तिघांनी अमळनेर न्यायालयात अर्ज करून वारस दाखला मिळवला होता. त्यानुसार त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात वारसाचे नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. परंतु भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी त्यांना नऊ वारस असल्याने पूर्ण वारसांच्या नावाचा दाखला आणा असे सांगितल्यांनंतर ज्ञानेश्वर जोगी यांनी ऍड व्ही वाय बडगुजर यांच्यामार्फत पुन्हा नऊ लोकांचा वारस दाखला मागण्यासाठी अर्ज केला. यापूर्वी वारस दाखला दिला असल्याची बाब न्या एस एस अग्रवाल यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जुने प्रकरण मागवले. त्यात अर्जदारांनी फक्त तीन वारस  असल्याचे खोटे कागदपत्रे जमा करून इतर सहा वारसदारांची नावे लपवली होती. म्हणून न्या अग्रवाल यांनी सहाययक अधीक्षक राहुल वसंत सपकाळे याना अधिकार देऊन पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने ज्ञानेश्वर ,राजेंद्र आणि देवराम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.