जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने 25 टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या 927 फे:या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बस स्थानकावर प्रवासी व विद्याथ्र्याना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. फे:या रद्द झाल्याने सुमारे 7 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. जो र्पयत शासन 25 टक्के पगारवाढ करत नाही तोर्पयत संप सुरूच राहणार असा पावित्रा घेत इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत आणि जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आगारात पहाटे 4 वाजेपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. बसस्थानक गेटच्या मधोमध बसून कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करत आगार दणाणून सोडले. प्रवाशी व विद्याथ्र्याचे हाल संपामुळे अचानक बसफे:या रद्द झाल्याने प्रवाशी व विद्याथ्र्याचे हाल झाले. अनेक प्रवाशी बाहेरील राज्यातून आल्याने त्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले. संपामुळे प्रवाशांना का वेठीस धरले गेले म्हणून आंदोलनकत्र्यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. महिला प्रवाशीही घरी जाण्यासाठी चिंतेत दिसत होत्या. पहाटेच्या सुमारास काही बसफे:या सुरू असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले, मात्र 11 वाजेपासून सर्वच बसफे :या बंद झाल्याने घरी परत कसे जायायचे असा प्रश्न विद्याथ्र्याना पडला. विद्याथ्र्याकडे पासेस् असल्याने पैसे नव्हते, म्हणून त्यांना खाजगी वाहतुकीनेदेखील घरी जाता येत नव्हते. स्थानकात प्रवाशी व विद्याथ्र्याच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते.