शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

९ हजारावर लाभार्र्थींचे अंगठे जुळेना ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:05 IST

जामनेरची स्थिती : नावेही गायब, शेंदुर्णीच्या अनेक महिला व पुरुषांची तहसील कार्यालयावर ‘धडक’

जामनेर : अंत्योदय व प्राधान्य योजनेतील सुमारे ९ हजार लाभार्थ्यांचे अंगठे जुळत नसल्याने ही कुटुंबे शिधा पत्रिकेद्वारे मिळणाऱ्या धान्यापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेंदुर्णी येथील सुमारे १०० महिला व पुरुषांनी गुरुवारी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागावर धडक दिली. त्यांनी केलेल्या तक्रारीतून ही बाब समोर आली. याच बरोबर काही काही लाभार्थ्यांची नावे संगणकीय प्रणालीतून गायब झाल्याने लाभार्थी त्रस्त आहेत.अंत्योदय व प्राधान्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या तालुक्यात सुमारे ४८ हजार असून त्यातील सुमारे ९ हजार लाभार्थ्यांचे अंगठे जुळत नसल्याने त्याना धान्य पुरवठा केला जात नाही. नेरी, शेंदुर्णी, लोंढरी, गोद्री, फत्तेपूर, जामनेर, पहूर, कुंभारी बुद्रुक, तोंडापूर आदी गावातील लाभार्थ्यांची याबाबत तक्रार आहे. शेंदुर्णी येथील त्रस्त लाभार्थ्यांनी तहसीलदार नामदेव टिळेकर व पुरवठा अधिकारी यांची भेट घेतली व नियमित धान्य पुरवठा करण्याची मागणी केली.दरम्यान, नवीन शिधा पत्रिका बनवून देण्यासाठी १ हजार घेतले व शिधा पत्रिका देखील मिळाली. मात्र धान्य दुकानदार धान्य देत नसल्याची तक्रार शेंदूणीर्तील एका महिलेने केली. यावेळी पैसे घेणारा तो युवक हजर होता, महिलेच्या तक्रारीनंतर त्याने पोबारा केला.‘आॅनलाईन’ चा फज्जा, लाभार्थी त्रस्ततालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांचे आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया गेल्या दीड वर्षांपासून सुरु आहे. ज्यांनी आधार लिंक केले त्यांची देखील नावे संगणकीय प्रणालीतून गायब झाल्याचे दिसत आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे...........ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले आहे, मात्र अंगठे जुळत नाही त्यांना नॉमिनी लावून ध्यान्य पुरवठा केला जाईल. ज्यांची नावेच संगणकीय प्रणालीत दिसत नाही त्यांना आधार कार्ड लिंक झाल्यानंतर पुरवठा केला जाईल. आॅनलाईन प्रणालीचे काम प्रगतीपथावर आहे.- नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेर.