जळगाव : सिमीच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या 9 जणांना समन्स काढावेत असा अर्ज सरकारी वकील टी.डी.पाटील यांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. आता यावर 9 ऑक्टोबर रोजी कामकाज होणार आहे. न्या.ए.के. पटनी यांच्या न्यायालयात हा बहुचर्चित खटला सुरू आहे. खटल्यातील अय्युब शेख बशीर हा मुंबई येथील साखळी बॉम्बस्फोटातही आरोपी आहे. त्याला बुधवारी मुंबई न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट केली असता त्यात त्याने आपण जळगावात सिमी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले होते. डॉ.एस.मालीन यांनी त्याची नार्को टेस्ट करून जबाब नोंदविला होता. शेख इकबाल शेख रसुल, सुभाष रमेश पाटील, सुपडू शेख सुपडू सायबु, मोहम्मद तबरुल्ला,अरुण रामचंद्र निकम,डॉ.एस.मालीन, अनिल ठाकुर व गोरख दिवे आदीची यादी दिली. यातील वाय.डी.पाटील यांचे निधन झाले आहे.