शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

9 कोटीचा निधी मनपात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:13 IST

घनकचरा प्रकल्प : प्रशासनाचे दुर्लक्ष; 32 कोटीचा डीपीआर मंजूर

ठळक मुद्दे दोन महिन्यांपासून निधी अखर्चित सध्या मनपाकडे 35 घंटागाडय़ा
जळगाव : आव्हाणे शिवारातील मनपाचा गेल्या चार वर्षापासून बंद असलेला घनकचरा प्रकल्प कार्यान्वित व्हावा, यासाठी शासनाने मनपाने पाठवलेला 32 कोटी रुपयांचा डीपीआर जानेवारी महिन्यातच मंजूर केला आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 9 कोटी रुपयांचा निधी मनपाकडे प्राप्त झाला असून, या निधीतून मनपा प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. चार वर्षापासून बंद पडलेला घनकचरा प्रकल्पात 1 लाख टन हून अधिक कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. तसेच या बंद पडलेल्या प्रकल्पामुळे जळगाव शहरातील हजारो नागरिकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निधी नसल्याची तक्रार का ? मनपा आयुक्तांनी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी 32 कोटीच्या निधीला शासनाने मान्यता देवून फेब्रुवारी महिन्यात पहिल्या टप्प्यात 9 कोटीचा निधी मनपा प्रशासला दिला होता. या निधीतून घनप्रकल्पातील तांत्रिक साहित्य खरेदी करावयाचे होते. मात्र, दोन महिन्यांपासून हा निधी अखर्चित आहे. 85 घंटागाडय़ा खरेदी कधी करणार ?शहरातील सफाईचा प्रश्न गंभीर होत आहे. मनपा प्रशासनाकडून सफाईचे कितीही दावे केले जात असले तरी मात्र ते फोल ठरताना दिसत आहेत. सध्या मनपाकडे 35 घंटागाडय़ा आहेत. त्यात खासगी ठेकेदाराच्या गाडय़ा धरुन 120 घंटागाडय़ांची संख्या आहे. शहराच्या वाढत जाणारी व्याप्ती पाहता मनपाला मिळालेल्या 9 कोटीच्या निधीतून 85 घंटागाडय़ा खरेदी करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ती कार्यवाही देखील रखडली आहे.टेकAीकल कंपनीची घेणार मदत 32 कोटीच्या डीपीआरचा अभ्यास करून शासनाकडून मिळणा:या निधीचा कसा खर्च केला जावा. यासाठी मनपा प्रशासनाला एका टेकAीकल कंपनीची मदत घेण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून औरंगाबाद येथील एका कंपनीची निवड केली आहे. एकुण 32 कोटीचा निधीतून घेण्यात येणारे साहित्य व संपूर्ण आढाव्याची माहिती या कंपनीकडून मनपाला देण्यात येणार आहे. मात्र, या कंपनीची नेमणूक करून देखील अद्याप मनपा प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यातील निधीबाबत कुठलीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.