शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

८७९ शाळांचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:38 IST

६७५ ठिकाणी वीज मीटरच नाही

ठळक मुद्दे ७६ लाख १७ हजार रूपयांची थकबाकी

जळगाव : इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे जि़प़शाळांच्या विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे, यासाठी शासन आणि प्रशासनाचा नेहमीच आग्रह असतो़ मात्र, दुसरीकडे वीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ८७९ प्राथमिक जिल्हा परिषद शाळांची बत्ती गुल झाली आहे़ या शाळांकडे तब्बल ७६ लाखांची वीज बिलाची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण सोडाच साधे संगणक शिक्षणही मिळेनासे झाले आहे़विज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी व्हावे, सोबतच त्यांना एका क्लीकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी, यासाठी शासनाने डिजीटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. या डिजीटल शाळांसाठी अनुदान न देता समाजातील लोकांना भावनिक आवाहन करून त्यांच्या पैशांतून आपापल्या गावातील शाळा डिजीटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. त्यानुसार शिक्षक, मुख्याध्यापकांनी जबाबदारी पेलत जिल्ह्यातील १८३१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपैकी १६१५ शाळा डिजीटल केल्या़ एवढेच नव्हे तर ६६ शाळा आयएसओही झाल्या़ डिजीटल शाळांसाठी व इतर उपक्रमांसाठी शासनाने अनेक शाळांना संगणक, एलसीडी, प्रोजेक्टर्स दिलेले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, त्यासंबंधीचे शिक्षण द्यावे, यावर भर दिला जात आहे़ मात्र, जिल्ह्यातील तब्बल ८७९ प्राथमिक शाळांचा वीज पुरवठाच खंडित असल्यामुळे डिजीटल शिक्षण व साहित्याचा उपयोगच काय? असा सवाल आता शिक्षण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे़७६ लाखांची थकबाकीआज जिल्ह्यातील जवळपास ८७९ च्या शाळांकउे ७६ लाख १७ हजार ७२ रूपये एवढे वीज बिल थकले आहे. शासनाकडून वीज बिलासाठी व शाळा डिजीटल करण्यासाठी एकही रूपयांचे अनुदान देण्यात आलेले नाही़, अशी माहिती मिळाली.मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खिशातून पैसे१८३१ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी फक्त ११५६ शाळांना वीज मीटर आहेत़ तर उर्वरित ६७५ शाळांना वीज मीटरच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ दरम्यान, एकूण शाळांपैकी ९५२ शाळांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊन नये म्हणून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यांच्या खिशातील पैसे वीज बिलासाठी मोजावे लागतात़ त्यामुळे शाळांची वीज सुरळीत होत आहे.