शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीचे ८६ लाख जिल्हा बॅँकेत पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 12:34 IST

जिल्हा परिषदेने पाच महिन्यांपूर्वीच बॅँकेकडे वर्ग केली रक्कम

ठळक मुद्देजिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ४२१जि.प.ने बँक खातेक्रमांकासह दिली यादीपाच महिन्यांपासून बॅँकेने रक्कम स्वत:कडेच ठेवल्याने आश्चर्य
आॅनलाईन लोकमत कळमसरे, ता.अमळनेर, दि...२१ : आदिवासी मुला-मुलींना मिळणारी सुवर्ण महोत्सवी मॅट्रीकपूर्व आदिवासी शिष्यवृत्तीची तब्बल ८६ लाखाची रक्कम जिल्हा बॅँकेकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेने मार्च २०१७ मध्येच ही रक्कम जिल्हा बॅँकेकडे धनादेशाद्वारे वर्ग केली आहे.पाच महिने उलटून देखील जिल्हा बॅँकेने लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही.कळमसरे हायस्कुलने अमळनेर पंचायत समिती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जळगाव अशी टप्याटप्याने सखोल चौकशी केली असता, जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाकडे ही रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वीच पाठविल्याचे निदर्शनास आले. पाचवी ते दहावीपर्यंतच्या अदिवासी मुला-मुलींना सुवर्ण महोत्सवी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ४२१ लाभार्थी विद्यार्थी संख्या असून, त्यांची ८६ लाख ३१ हजार ५०० रूपयांची शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. बॅँक खाते क्रमांकासह लाभार्थी विद्यार्थ्यांची नावानिशी यादी सोबत देऊनही अजुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झालेली नाही.जिल्हा बॅँकेचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन होते. तरी देखील पाच महिन्यांपर्यंत शिष्यवृत्तीची ८६ लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेने स्वत:जवळच ठेवल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलीला १५०० रूपये तर आठवी ते दहावीच्या अनु.जमाती मुले-मुलींना २००० रूपयांप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा होत असते. याबाबत जिल्हा बॅँकेच्या बॅँकीग शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, यासाठी २१ प्रस्ताव आले आहेत. आतापर्यंत आतापर्यंत फक्त सहा प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. या रक्कमा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या आहेत. अजुन १५ प्रस्ताव बाकी असल्याचे सांगण्यात आले. शिष्यवत्ती रक्कम शाळा देत नसल्याचा पालकांचा शाळाविषयी रोष व्यक्त होत आहे. चौकशी करणार : खेवलकरया संदर्भात चौकशी केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांची रक्कम देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर यांनी सांगितले.