नंदुरबार : तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 82.59 टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांतता परंतू प्रचंड चुरस होती. सकाळपासूनच मतदानात उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सरासरीच्या 82.59 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कं्रढे ग्रामपंचायतीत 94.32 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान भालेर ग्रामपंचायतीत 77.84 टक्के झाले. दरम्यान, गुरुवार, 29 रोजी सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आयटीआयच्या मेस हॉलमध्ये तयार करण्यात आली असल्याचे तहसीलदार महेश शेलार यांनी सांगितले.
ग्रां.प.साठी 82 टक्के मतदान
By admin | Updated: October 29, 2015 00:35 IST