जळगाव : जिल्हाभरात सुरुवातीपासून कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लसीचाच अधिक पुरवठा झाला असून याचीच संख्या अधिक आहे. त्यात सद्य:स्थिती जिल्हाभरात कोविशिल्डचे ८९६० डोस शिल्लक आहे. कोव्हॅक्सिनचे ८६० डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिन लस नसल्याने चेतनदास मेहता हे केंद्रही शुक्रवारी बंद राहणार आहे. येत्या काही दिवसात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू होणार असल्याने त्यावेळी पुन्हा लसीच्या तुटवड्याचा विषय समोर येऊ शकतो, त्यामुळे आताच ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी केले आहे. कोव्हॅक्सिनच्या उपलब्ध डोसमधून आता १८ ते ४४ वयोगटासाठीही दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जात आहे. मात्र, लस घेणाऱ्यांची संख्या घटल्याने केंद्र ओस पडू लागली आहेत.
कोविशिल्डचे ८ हजार डोस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST