शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

एकाच कॉलनीत 80 टक्के अवैध कनेक्शन

By admin | Updated: October 10, 2015 00:42 IST

धुळे : शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमनागिरी कॉलनीत 80 टक्के नळ कनेक्शन अवैध आढळून आले.

धुळे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम आणि नळाला तोटय़ा न लावणा:या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमनागिरी कॉलनीत 80 टक्के नळ कनेक्शन अवैध आढळून आले. दरम्यान, आठवडय़ाभरात नळाला तोटय़ा न बसविणा:या 40 लोकांकडून 1 लाख 20 हजारांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती मनपाचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत पाटील यांनी ‘लोकमत’

शी बोलताना दिली.

चक्करबर्डी परिसर

शहरातील जमनागिरी परिसरात महापालिकेच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकली़ शोध घेतला असता या भागात सुमारे 80 टक्के नागरिकांकडे अवैध नळ कनेक्शन असल्याचे आढळून आल़े सापडलेल्या सर्वाना नळ कनेक्शन दंडात्मक रक्कम भरून वैध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या़

याशिवाय चक्करबर्डी परिसरत आणि मोगलाई भागात असलेल्या गवळीवाडा भागातही काही प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आढळून आले आहे. त्या सर्वानाही नळ कनेक्शन वैध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

लेनिन चौक परिसर

शहरातील फाशी पूल भागात असलेल्या लेनिन चौक परिसरात तपासणी केली असता नळाला तोटय़ा आढळून आल्या नाही़ याशिवाय अवैध नळ कनेक्शनदेखील सापडल़े त्या सर्वाना समज देण्यात आली़ ज्या ठिकाणी तोटय़ा आढळल्या नाही, अशा नळधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़

दंडात्मक कारवाई

शहरात राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत 40 जणांच्या नळाला तोटय़ा लावल्या नसल्याचे उजेडात आल़े त्या प्रत्येकाला 3 हजारप्रमाणे दंड ठोठावण्यात आला आह़े एकंदरीत पाहता त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल करून महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आह़े

पथकात यांचा समावेश

महापालिकेच्या विशेष पथकात कनिष्ठ अभियंता श्रीकांत पाटील, अजिंक्य पाटील, फिटर वाल्मीक कोळी, व्हॉल्व्हमन शंकर पवार, संजय अजळकर यांचा समावेश आह़े

विविध भागात फिरून पथकाकडून कारवाई केली जात आह़े दरम्यान, अशाप्रकारची शोध मोहीम अव्याहतपणे आता यापुढील काळात सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका पथकाने

4तोटय़ा नसलेल्या नळधारकांवर दंडात्मक कारवाई करावी़ अवैधरित्या नळकनेक्शन घेतलेल्यांना कनेक्शन वैध करून घेण्याची ताकीद द्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी विशेष पथकाला दिल्या आहेत़

4नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचा:यांकडून कारवाई होत असल्याने यापूर्वीच्या जून्या कर्मचा:यांनी आजवर काय केले? संबंधितांवर कारवाई का केली नाही? असा सवाल साहजिकच आता उपस्थित होत आह़े

‘लोकमत’ला दिली.