शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनचे ७८ टक्के बेड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. मार्च, एप्रिल हे दोन महिने अगदीच कठीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. मार्च, एप्रिल हे दोन महिने अगदीच कठीण होते. मात्र, कोरोनाची ही लाट ओसरत असून, आता तीन ते चार तालुके सोडले तर उर्वरित भागात ४०० पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील एकू्ण सक्रिय रुग्णांपैकी केवळ १७ टक्के रुग्ण हे विविध रुग्णालयात दाखल आहेत. विशेष बाब म्हणजे ऑक्सिजनचे ७९ टक्के बेड सद्य:स्थितीत रिक्त आहेत.

मार्च व एप्रिलची तुलना केली असता मे महिन्यात रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. यासह होम आयसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे. रुग्णालयात कमी रुग्ण असल्याने यंत्रणेवरचा ताण कमी होत असून, आहे त्या रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्वक उपचार देणे सोपे होत असून, बेड रिक्त आहेत या मानसिकतेमुळेही रुग्णांना आधार मिळत आहे. मध्यंतरी बेडच मिळत नव्हते, या माहितीमुळे रुग्णांना अधिक धक्का बसत होता. आता शासकीय, खासगी दोनही यंत्रणांमध्ये पुरेसे बेड रिक्त आहेत.

तीन महिन्यातील स्थिती

३० मार्च : सक्रिय रुग्ण : ११,६७४, रुग्णालयात दाखल रुग्ण २३.५९ टक्के

३० एप्रिल : सक्रिय रुग्ण : १०,६६१, रुग्णालयात दाखल रुग्ण २७.४५ टक्के

३० मे : सक्रिय रुग्ण : ६१९१, रुग्णालयात दाखल रुग्ण १७ टक्के

सक्रिय रुग्ण सर्वात कमी असलेले पाच तालुके

भडगाव : ५२

धरणगाव : १८४

पारोळा : १८९

अमळनेर : २१०

जळगाव ग्रामीण : २३५

बेडची स्थिती

एकूण बेड : १४,४६०

डीसीएचसी : ३६५३

डीसीएच : १११०

कोविड केअर सेंटरचे बेड ९६९७

एकूण सक्रिय रुग्ण : ५९१५

डीसीएचसी : ७९०

डीसीएच : २१९

यंदा ग्रामीण भागात उद्रेक

पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरातच आढळून आले होते. शिवाय लाट ओसरत असतानाही शहरातच सर्वाधिक सक्रिय रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत मात्र जळगाव शहरवगळता जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढून प्रथमच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत जळगावचा चौथा क्रमांक आहे. जळगाव्या आधी चाळीसगाव, भुसावळ, जामनेर या भागात अधिक सक्रिय रुग्ण आहेत. याचा अर्थ कोरोनाचे नियंत्रण हे जळगाव शहरापासून सुरू झाले असून, हळूहळू ग्रामीण भागात वाढलेला कोरोना आता नियंत्रणात येत आहे.

रुग्णालये बंद

कोरोनाची लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण शिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने लोक होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यावर भर देत आहेत. थेट रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अगदीच कमी झाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातील २५ ते ३० कोविड रुग्णालये दुसऱ्या लाटेत बंद झाली आहेत. रोज किमान एक ते दोन रुग्णालयांची कोविड सेवा बंद करण्याबाबतच पत्र येत असल्याची माहिती आहे.