शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात होणार 74 नवीन महाविद्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 19:05 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा प्रस्तावित सुधारित बृहत आराखडा

ठळक मुद्देबृहत आराखडय़ात नवीन 74 महाविद्यालयांचा समावेश नंदुरबारला होणार अभियांत्रिकी महाविद्यालय मोठय़ा महाविद्यालयांसाठी सॅटेलाईट सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्तावखान्देशात 32 ठिकाणी कौशल्य विकास महाविद्यालये प्रस्तावित

चुडामण बोरसे/ ऑनलाईन लोकमत जळगाव,दि.28 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने सन 2018-19 व  2019-20 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी बृहत आराखडा सादर  केला आहे. यात नवीन 74  महाविद्यालयांचा समावेश आहे. या प्रस्तावित आराखडय़ास अद्याप मान्यता मिळालेली नाही.   हा बृहत आराखडा एप्रिल 2017 मध्येच महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगास सादर केला होता. त्यात पुन्हा दुरुस्ती करून हा अहवाल गेल्या महिन्यात आयोगाला सादर करण्यात आला. या नवीन आराखडय़ानुसार, प्रस्तावित 74 महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा आहेत. तसेच व्यवस्थापन शास्त्राच्या 11  शाखाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.   प्रस्तावित महाविद्यालये असे असतील.जळगाव जिल्हा जळगाव- शिरसोली, नशिराबाद, भोकर, म्हसावद. अमळनेर- जानवे, पातोंडा, मांडळ. धरणगाव- पाळधी, बांभोरी बुद्रूक, साळवा. एरंडोल- कासोदा, कढोली. चोपडा- हातेड,  उमर्टी, घोडगाव, गलंगी, चहार्डी. चाळीसगाव- वाघळी, तळेगाव, पिंपरखेड, मेहुणबारे. पाचोरा- नगरदेवळा, लोहारा. भडगाव- कजगाव, जुवार्डी. पारोळा- तामसवाडी, देवगाव.  जामनेर- फत्तेपूर, नेरी, पहूर. रावेर-रावेर, चिनावल. यावल- हरिपुरा, किनगाव, साकळी, शिरसाठ. मुक्ताईनगर- अंतुर्ली, कु:हा काकोडा. बोदवड- जामठी, भुसावळ- दीपनगर, कु:हे पानाचे.धुळे जिल्हा- धुळे -  शहर, अवधान, फागणे, मुकटी, बोरकुंड,  नेर, शिरुड, आर्वी, महिंदळे.  शिरपूर- अर्थे, वरुड, सांगवी. शिंदखेडा -धमाणे, विरदेल, ब्राrाणे. नंदुरबार जिल्हा- नंदुरबार- नंदुरबार, रनाळे. नवापूर- नवापूर, विसरवाडी, नवागाव, खांडबारा. शहादा- मंदाणे, तोरणमाळ, ब्राrाणपुरी. तळोदा- बोरद, प्रतापपूर. अक्कलकुवा- मोलगी. पाच महिला महाविद्यालये याशिवाय उच्च शिक्षणासाठी महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाच महिला महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. तीन तालुके मिळून एक महिला महाविद्यालय असेल. खान्देशात विद्यापीठ क्षेत्रात काही ठिकाणी एस.एन.डी.टी. महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे त्या तालुक्यांचा विचार यात करण्यात आलेला नाही. कौशल्य विकास महाविद्यालयेया बृहत आराखडय़ात खान्देशात 32 ठिकाणी कौशल्य विकास महाविद्यालये प्रस्तावित आहेत. जळगाव जिल्हा- जळगाव- जळगाव, म्हसावद, शिरसोली. भुसावळ, रावेर व यावलसाठी एक.  मुक्ताईनगर, बोदवड व वरणगावसाठी एक. पाचोरा व भडगावसाठी एक, पारोळा व एरंडोलसाठी एक, अमळनेर, धरणगाव, चोपडा, जामनेर, चाळीसगाव येथे प्रत्येकी एक. तसेच  पारोळा तालुक्यात  धूळपिंप्री, हिरापूर येथेही महाविद्यालये प्रस्तावित आहेत. धुळे जिल्हा- धुळे येथे दोन, अवधान, वाडीभोकर, शिंदखेडा-नरडाणा, शिरपूर, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर, निजामपूर. नंदुरबार जिल्हा- नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि मोलगी. सॅटेलाईट सेंटरचाही प्रस्ताव विद्यापीठांतर्गत येणा:या मोठय़ा महाविद्यालयांसाठी सॅटेलाईट सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्याची तयारी विद्यापीठाने दाखविली आहे. नंदुरबार  येथील आदिवासी अकादमी किंवा एकलव्य केंद्रांतर्गत कला अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव अपेक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य विकास यावर कोर्सेस सुरू करण्याचाही विद्यापीठाचा मानस आहे. यासाठी प्रस्ताव अपेक्षित आहेत.नंदुरबारला होणार अभियांत्रिकी महाविद्यालय नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तिथे एकही अभियांत्रिकी  महाविद्यालय नसल्याने तिथे आता एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार आहे. याशिवाय तीनही जिल्ह्यात चार ठिकाणी कला, वाणिज्य आणि व्यवस्थापनाची चार रात्रकालीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.