शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वकीलाच्या बंगल्यातून लांबविला 66 हजाराचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:16 IST

गणेशपुरीत घरफोडी : 13 दिवसांपासून बंद होता बंगला

ठळक मुद्देचार खोल्यांमधील कपाट फोडलेकुरीअरवाल्याच्या लक्षात आली घटना बंगल्याला कुलुप होते

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - औरंगाबाद खंडपीठात वकील असलेल्या नजम ए. देशमुख यांच्या जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील गणेशपुरी येथील बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 24 ग्रॅम सोन्यासह 3 हजार 600 रुपये रोख असा 66 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अॅड.देशमुख यांच्या आई 10 ऑगस्ट रोजी मुंबई येथे गेलेल्या असल्याने त्या दिवसापासून बंगल्याला कुलुप होते.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेहरुणमधील गणेशपुरी भागात प्लॉट क्रमांक 13 मध्ये अॅड. नजम देशमुख यांचा ‘रुहुम’ बंगला आहे. अॅड.देशमुख हे औरंगाबादला खंडपीठात वकीली व्यवसाय करत असल्याने ते तेथेच वास्तव्याला आहेत तर वडील एहतेशामोद्दीन देशमुख यांचे निधन झाल्याने आई नफीसा नाहीद एकटय़ाच या बंगल्यात राहत होत्या. मुलगा औरंगाबादला तर मुलगी रुही देशमुख मुंबईला राहत असल्याने आई या अधूनमधून दोघांकडे जात असतात. 10 ऑगस्ट रोजी आई या मुंबई येथे मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे बंगल्याला कुलुप होते.नफीसा वाहेद देशमुख यांच्या नावाने कुरीअरचे पार्सल घेऊन एक व्यक्ती बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी गेला होता. दरवाजा उघडा असतानाही घरातून कोणीच प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे कुरीअरचा कर्मचारी शेजारी असलेल्या सुलोचना रवींद्र पाटील यांच्याकडे गेला. देशमुख यांचे घर उघडे आहे, मात्र आवाज देऊनही कोणीच प्रतिसाद देत नाही, त्यामुळे हे पार्सल तुम्ही घ्या व नंतर त्यांना द्या असे त्याने सांगितले. त्यावर सुलोचना पाटील यांनी नफीसा यांना फोन केला असता मी मुंबईत आहे, जळगावच्या घरी कोणीच नाही असे नफीसा यांनी सांगितले असता मग घर कसे उघडे असा प्रश्न करुन त्यांनी घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले.घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर नफीसा यांनी मुलाचा मित्र असलेले अॅड.रहिम पिंजारी यांना फोन करुन घरी पाठविले. त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक समाधान पाटील, कॉन्स्टेबल भरत लिंगायत व अशरफ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बंगल्यातील चारही खोल्यांमधील कपाटे फोडलेली व त्यातील सामान बाहेर फेकलेला आढळून आला.