शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘लम्पी’मुळे आणखी ६ जनावरांचा मृत्यू; चोपडा, जळगावातही शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 19:40 IST

‘लम्पी’चे संकट निवारण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शामकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे

कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ‘लम्पी’ने पशुधनावर मृत्यूसंकट उभे केले आहे. शुक्रवारी ६ जनावरांचा मृत्यू झाला.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ३६ हजार ८८२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले.त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी ९१ इतकी झाली आहे.

धरणगाव (३), अमळनेर(६), पारोळा (१८), जामनेर (२), पाचोरा (२), जळगाव (२), चाळीसगाव (३४) तालुक्यातील ६७ जनावरांना शुक्रवारी लम्पीची लागण झाली. त्यामुळे सध्या बाधीत जनावरांची संख्या ४२९ वर गेली आहे. 

तालुकानिहाय जनावरांचा मृत्यूधरणगाव (१), पारोळा (७), जळगाव (१), एरंडोल (८), पाचोरा (७), चोपडा (५५), चाळीसगाव (५), अमळनेर (१) या तालुक्यात आतापर्यंत ८५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणासाठी धावाधाव‘लम्पी’चे संकट निवारण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शामकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. शुक्रवारी ३६ हजार ८८२ जनावरांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात ५ लाख १९ हजार ३३६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ५८ हजार ६६४ जनावरांचे लसीकरण अपूर्ण आहे. येत्या दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण होईल, अशी माहिती डॉ.पाटील यांनी दिली.

भरपाईचे प्रस्ताव तयारदरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या ८५ पशुमालकांना भरपाई देण्यासाठी तालुका पातळीवर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. शनिवारी या प्रस्तावांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्यावतीने नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार व वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.