शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘अतिक्रमण निर्मूलन’चे ६ कर्मचारी निलंबित

By admin | Updated: March 2, 2017 00:56 IST

मनपा आयुक्तांचे आदेश : जप्त मालाची विल्हेवाट व पैसे मागणे भोवले

जळगाव : दादागिरी,  शिवीगाळ करणे, अतिक्रमणधारकांकडून पैसे मागणे, जप्त केलेला माल परस्पर विकणे आदी आरोपांवरून अतिक्रमण निर्मूलन विभागातील ६ कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यात वाहनचालक साजीद अली आबीद अली, मोहसीन शेख आसीफ, मोहन गवळी, गीता अटवाल, आनंद गोयर, नीलेश चव्हाण यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांबाबत सातत्याने पैसे मागितल्याच्या तसेच शिवीगाळ करणे, जप्त मालाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या तक्रारी येत आहेत. मंगळवारी झालेल्या महासभेत तर याविषयावरून जोरदार चर्चा झाली. भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी फोटोसह तक्रार करूनही आयुक्त कारवाई करीत नसल्याचा आरोप केला. नेमके त्याच दिवशी सायंकाळी समांतर रस्त्यावरील कारवाईत जप्त केलेल्या सामानातील लोखंडी पोलची शिक्षण मंडळ कार्यालयाच्या आवारात उभ्या अतिक्रमण विभागाच्या ट्रकमधून विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे आढळून आले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच आयुक्तांनी त्याची दखल घेत आधीच विविध तक्रारींवरून चौकशी सुरू असलेल्या अतिक्रमण विभागाच्या ६ कर्मचाºयांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. अजिंठा चौक ते गोदावरी अभियांत्रिकीपर्यंतचे अतिक्रमणे हटलिवीतिसºया दिवशी महामार्गावरील अजिंठा चौक ते गोदावरी अभियांत्रिकीपर्यंतचे अतिक्रमणे हटविण्यात आली. आता या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाही, याकडे मनपा व प्राधिकरणाला लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने आता समांतर रस्त्यावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेले ढिगारे पसरविणेही आवश्यक आहे. ते पसरविल्यास रस्ता वापरता येईल. समांतर रस्त्यांसाठी तयार करण्यात येणाºया डीपीआरचे कामही जोरात सुरु आहे. दरम्यान, साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी काही लोटगाड्या, टपºया महामार्गालगत लपविण्यात आल्या आहेत, त्यांचाही शोध घेणे आवश्यक आहे. सतरा वर्षांपासून असलेले अतिक्रमणे जमिनदोस्तराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांपासून महामार्गालगतचे अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे़ बुधवारी तिसºया दिवशी अजिंठा चौक ते खेडीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले़ सतरा वर्षापासून याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकांनी शेड तसेच पक्के सिमेंटचे बांधकाम तसेच लाकडी पाट्यांचे शेड तयार केले होते़ कारवाईत ते जमीनदोस्त करण्यात आले़किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेतबुधवारी अजिंठा चौफुलीपासून पुढे मोहीम राबविण्यात येत असताना एस.टी. वर्कशॉपजवळील क्वॉर्टर्सजवळ भिंतीलगत असलेल्या फर्नीचरच्या दुकानाचे अतिक्रमण हटवित असताना वाद झाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेपकरीत वाद मिटविला. हातगाडी, टपरी व फलक जप्तया मोहीमेत हातगाडी, सलून टपरी, भंगार तार,लोखंडी पाईप, पत्रे, लोखंडी व साधे फलक याप्रकारचे ३५ साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्वाधिक ५०१ लोखंडी मोठे पाईप व लहान पाईप जप्त करण्यात आले.याशिवाय खुर्च्या व लाकडी बाक, लोखंडी फलक, चौकोनी पाईप जप्त करण्यात आले.अजिंठा चौफुलीवर एका खाजगी हॉटेलसमोर महामार्गालगत भुसावळकडे जाणारी खाजगी वाहने लागतात़ या वाहनधारकांकडून महामार्गावर प्रवाशांची उतरचढ करण्यात येते़ ही वाहने वाहतुकीची कोंडी होण्यास कारणीभूत ठरतात़ अशा बेशिस्त वाहनांवरही कारवाई करावी किंवा त्यांना थांब्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे़