शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

५९ गावांचा कृती आराखडा तयार

By admin | Updated: April 13, 2017 00:24 IST

संभाव्य पाणीटंचाई आढावा : १३ पैकी सहा लघु पाटबंधारे तलावा कोरडेठाक

चाळीसगाव : तालुक्यात  दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे.  त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ५९ गावांचा पाण्याचा संभाव्य कृती आराखडा तयार आहे. अद्यापपावेतो कुठल्याही गावाला पाणीटंचाईची झळ बसली नाही, मात्र तालुक्यातील वाघळी ग्रा.पं.च्या वतीने पाण्याच्या  टँकरची मागणी करण्यात आली आहे.तालुक्यातील १४३ पैकी ५९ गावांचा संभाव्य पाणी कृती आराखडा ग्रा.पं.च्या मागणीनुसार तयार करण्यात आला असून या गावांना २१० उपाययोजना प्रस्तावित आहेत. या कृती आराखड्यात बिलाखेड, खेरडे, टाकळी प्र.दे.  घोडेगाव या चार गावांना विहीर खोलीकरण मंजूर आहे. एप्रिल ते जूनपर्यंत संभाव्य पाणीटंचाई असलेल्या ओढरे, बोरखेडे बु।।, भऊर, चांभार्डी खुर्द, दहिवद, देवळी, दरेगाव, डामरुण, डोणदिगर, जामडी, जुनोने , कळमडू, राजमाने, अभोणे, अभोणेतांडा, कोदगाव, गणपूर, खडकीसीम, खेडगाव, मांदुर्णे, न्हावे, ढोमणे, पिलखोड, पिंपळगाव, पिंपरखेड, गोरखपूर, सायगाव, शिंदी, शिरसगाव, उंबरखेडे, वडाळा-वडाळी, वरखेडे खुर्द, वाघळी, तळोंदे प्र.चा, पाथरडे, तामसवाडी, राजदेहरे या गावांना पाणीटंचाई भासू शकते. या गावांना संभाव्य पाणी कृती आराखड्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्याप या गावांकडून पाणीटंचाई नसल्यामुळे कुठलीही मागणी करण्यात आली नाही. दरम्यान वाघळी गावाचा पाणीटँकरचा प्रस्ताव पं.स.ला प्राप्त झाला आहे. कुठल्याही गावाला पाणीटंचाई उद्भवल्यास किंवा प्रती माणसी २० लीटरपेक्षा कमी पाणी एखाद्या गावाला मिळत असेल तर त्या गावाला पाणीटंचाईची उपाययोजना करण्यात येते. त्यानुसार वरील गावे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाचोरा यांचेकडून प्राप्त झाली आहे.६ तलावात मृतसाठा चाळीसगाव तालुक्यातील १३ लघुपाटबंधारे पैकी ६ तलावात मृतसाठा शिल्लक आहे. उर्वरित ७ पैकी ४ गावांची स्थिती बºयापैकी आह. तीन तलाव मात्र काठावर आहेत.  (वार्ताहर)ुपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी  ल.पा. तलावांमध्ये ज्या शेतकºयांनी विजेचे पंप आहेत, त्यांना पाटबंधारे विभागातर्फे नोटिसा देण्यात आल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयानेदेखील  संबंधित ठिकाणच्या वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.