शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

231 ग्रामपंचायतींसाठी 5,783 उमेदवारी अजर्

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

बोरपाडाचा बहिष्कार : सोमवारी छाननी

 नंदुरबार : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जाचा अक्षरश: पाऊस पडला. तब्बल पाच हजार 783 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोमवार, 4 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान, बोरपाडा, ता.नवापूर येथील ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आला नाही.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच तहसील कार्यालयांमध्ये इच्छूक, त्यांचे समर्थक व गावक:यांची गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. अक्कलकुवा तालुक्यात 13 ग्रामपंचायतीसाठी 529, धडगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी 612, तळोदा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी 727, नंदुरबार तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींसाठी 917, नवापूर तालुक्यात 63 ग्रामपंचायतींसाठी 1,493 तर शहादा तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींसाठी 1,505 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, बोरपाडा, ता.नवापूर येथील ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. यंदाही ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.