शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५७ जण कुठल्याही क्षणी होऊ शकतात हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:45 IST

इलेक्शन इफेक्ट

ठळक मुद्देप्रशासनाकडून पडताळणीचे काम सुरु

 जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेस त्रासदायक ठरणाऱ्यांना हुडकून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भातील ५७ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या धोकादायक व्यक्तींवर कोणत्याही क्षणी हद्दपारीची कारवाई होण्याचे संकेत आहेत.लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर विविध तयारीला प्रशासनाकडून गती देण्यात आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांच्या रोज बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही माहिती घेतली जात आहे.हद्दपारीच्या कारवाया होणारनिवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश आहेत. तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.यासाठी उपविभागीय दंडाधिकारी जळगाव, भुसावळ, पाचोरा, फैजपूर, अमळनेर, चाळीसगाव यांना पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्याच्या सूचना होत्या.त्यानुसार या पाच उपविभागीय दंडाधिकाºयांना हद्दपारीचे प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अवैध दारूप्रकरणी १६२ जणांवर कारवाईनिवडणूक काळात अवैधरित्या दारू विक्रीचे प्रकार होतात. मुबंई दारूबंदी अधिनियम कलम ९३ नुसार जवळपास १६२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.जळगाव वगळता भुसावळ उपविभागात १४, पाचोरा १२, फैजपूर २७, अमळनेर ४६, एरंडोल ३ तर चाळीसगाव उपविभागात सर्वाधिक ६० अशा जिल्ह्यात १६२ जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या दारू बाळगणे, विक्री करणे, बनावट दारू विक्रीच्या प्रकरणात या कारवाया करण्यात आल्या असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.अधिकाºयांच्या सतत बैठकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांकडे विविध विभागांच्या अधिकाºयांच्या सतत बैठका सुरू आहेत.निवडणुकीच्या दृष्टीने काय खबरदारी बाळगायची याबाबत अधिकाºयांना सूचना देण्यात येत आहेत.असे आहेत प्रस्तावउपविभागीय दंडाधिकारी जळगाव यांच्याकडे १६, भुसावळ - १७, पाचोरा २, फैजपूर ५, अमळनेर ७, एरंडोल ८, चाळीसगाव २ असे ५७ हद्दपारीचे प्रस्ताव आहेत. यातील ३० प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे १५ प्रकरणे आहेत. उर्वरित प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचे समजते. यातील काही जणांना तीन महिने, काहींना सहा, काही वर्षापर्यंत हद्दपार होऊ शकतात.

टॅग्स :Politicsराजकारण