शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

५४८ मतदान केंद्रे, साडेतीन हजार कर्मचारी

By admin | Updated: February 16, 2017 00:34 IST

जि.प.-पं.स. : तगडा पोलीस बंदोबस्त, चाळीसगावला ३५ बसेसची व्यवस्था

चाळीसगाव : जि.प.- पं.स. च्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण पूर्ण झाली असून २५७ मतदान केंद्रावर १७९९ कर्मचाºयांच्या निगरानीखाली मतदानाची प्रक्रिया गुरुवारी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान पार पडणार आहे.  मतदानासाठी  तगडा पोलीस बंदोबस्त असून तालुक्यातील सात गावे संवेदनशील आहेत.जि.प.च्या ७ तर पं.स.च्या १४ गणातील प्रचार १४ रोजी मध्यरात्री संपला.  बुधवारी येथील राष्ट्रीय महाविद्यालय प्रांगणातून मतदान कर्मचाºयांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे या परिसराला सकाळपासूनच यात्रेचे स्वरुप आले होते.  दुपारी ३ वाजेपर्यंत  या परिसरात कर्मचाºयांची गर्दी दिसून आली. मतदान केंद्रावर  कर्मचाºयांना घेऊन जाण्यासाठी परिवहन सेवा मंडळातर्फे ३५ बसेस पुरवण्यात आल्या होत्या. मतदान साहित्यासह कर्मचारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहचले.७५ उमेदवारांच्या भाग्याचा  फैसलाजि.प. ७ गटात एकूण २१ तर पं.स. १४ गणात ५१ असे ७५ उमेदवार निवडणूक आखाड्यात असून या सर्वांच्या भाग्याचा फैसला  गुरुवारी  मतदान यंत्रात बंद होणार आहे. तालुक्यातील २ लाख ४६ हजार २४७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  दरम्यान, प्रचाराच्या तोफा मंगळवारी रात्री थांबल्याने बुधवारी उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत मतदारांना मतदान करण्याचे साकडे घातले. काहींनी बूथनिहाय तयारीचा आढावाही घेतला.२५७ मतदान केंद्रतालुक्यात २५७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचाºयांसह ७ कर्मचारी राहतील. एकूण १७९९ कर्मचारी यासाठी  नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार व सहायक निवडणूक अधिकारी कैलास देवरे यांनी दिली.मतदान यंत्राची चाचपणीबुधवार सकाळी मतदान साहित्याचे वितरण झाल्यावर कर्मचाºयांनी मंडपातच मतदान यंत्राची चाचपणी केली. यंत्रे तपासून ते सुरू असल्याची खात्री करुन घेतली.७ गावे संवेदनशीलपोलीस रेकॉर्डनुसार तालुक्यातील ७ गावे संवेदनशील असून येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. शहर पोलीस स्टेशनअंतर्गत पातोंडा, कोदगाव, टाकळी प्र चा, तर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडे, हिंगोणे खुर्द, लोणजे, रांजणगाव ही सात गावे संवेदनशील असल्याची माहिती पोनि सुनील गायकवाड व आदिनाथ बुधवंत यांनी दिली.कडक पोलीस बंदोबस्तएक डीवायएपी, दोन पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, १३ पीएसआय, २६१ पोलीस, ८५ गृहरक्षक दल कर्मचारी, एक क्यूआरटी, एक आरसीपी, एक एसआरपी पथ असा फौजफाटा मतदान प्रक्रियेसाठी तैनात केला आहे.६३४ कंट्रोल युनिट२५७ मतदान केंद्रावर  ६३४ कंट्रोल युनिट व ६३४ बॅलेट युनिट देण्यात आले आहेत. कर्मचाºयांची बॅलेट व कंट्रोल युनिटची चाचणी घेऊन येथे ताब्यात घेतली. भडगावजि.प.च्या ३गटासाठी १० तर पं.स.च्या ६ गणासाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. १०६ मतदान केंद्रे असून ७१० कर्मचारी निवडणूककामी नियुक्त केले आहेत. तालुक्यात ९७ हजार ९६५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  तालुक्यात गट व गणाच्या तिरंगी-चौरंगी लढती होत आहेत.  निवडणूक  अधिकारी म्हणून रमेश मिसाळ, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सी.एम.वाघ, निवडणूक नायब तहसीलदार अमित भोईटे, नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, अरुण कदम व महसूल यंत्रणा कामकाज पाहात आहेत.  वोटिंग मशीन २१२ आहेत.  उपबाजार समिती आवारातून १३ बसेस, १८ खाजगी वाहनांनी मतदान केंद्रावर रवाना झाले. पोलीस बंदोबस्त असा...धुळे आरपीडीएस ५० कर्मचारी, एक डीवायएसपी, ५० होमगार्ड, दोन पीआय, पाच दुय्यम अधिकारी,  जळगाव मुख्यालयात १५ कर्मचारी , शहर वाहतूक कर्मचारी २०, भगावचे ३५ पोलीस कर्मचारी असा ताफा तैनात करण्यात आला आहे. पाचोरा५ जि.प. व १० पं.स. गणासाठी तालुक्यात  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून १८५ मतदान केंद्रावर  १२०० कर्मचारी रवाना झाले. जि.प.साठी १८५ व पं.स.साठी १८५ ईव्हीएम मशीन व ४० राखीव मशीन्स  असून मुंबई व नाशिक येथून  १०० पोलीस  ६ पोलीस अधिकारी ७५ होमगार्डसह  बांबरुड प्र.बो., अंतुर्ली, नगरदेवळा, तारखेडा, कळमसरे या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. जि.प.च्या पाच जागांसाठी २० तर पं.स.च्या १० जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहे. ग्रामीण भागातील  मतदान असल्याने मतदान केंद्रावर एसटी बसेसने कर्मचाºयांना रवाना केले. पाचोरा शहरापासून वरखेडी रोडवरील २ कि.मी. वरील साईमोक्ष लॉन्सवर मतमोजणी होणार आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तीनही तालुक्यातील लक्ष्यवेधी लढतींकडे जनतेचे लक्ष लागले आहे. गणातही चुरशीच्या लढती होत असल्याने जनतेचा कौल कुणाला? अशा चर्चा रंगल्या आहेत.