पंढरीनाथ गवळी/ ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.3 - मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांच्या सोयींसाठी विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने प्रवास करणा:या प्रवाशांच्या आरोग्या काळजीदेखील हा विभाग घेत आहे. त्यादृष्ठीने प्रवाशांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी भुसावळसह विविध रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर व्हेडींग मशीन’ची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ ला दिली.
दरम्यान, भुसावळ विभागात आणखी 52 वॉटर व्हेडींग मशीन उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मशीनमध्ये नाणी टाकून व मशीन स्वत: ऑपरेट करुन पाणी घेऊ शकतो अथवा तेथे नेमण्यात आलेल्या सेवकाची मदत घेऊ शकतो, असे मिश्रा यांनी सांगितले.
प्रवाशांना असे मिळेल पाणी
एक रुपयात 300 एमएल पाणी मिळेल.पाच रुपयात 1 हजार एएल, 20 रुपयात पाच लीटर आणि 25 रुपयात स्वत:चा जार असल्यास 20 लीटर पाणी मिळण्याची सोय या वॉटर व्हेडींगमशीनमध्ये आहे,असे मिश्रा यांनी सांगितले.
आणखी 52 मशिन बसविणार
भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर आणखी 52 वॉटर शुद्ध पाण्याचे मशीन उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली. प्रवाशांना प्रवास करताना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी अशा प्रकारच्या मशिनींची उभारणी करण्यात आल्याचे ते म्हणाले
या स्थानकावर येतील मशिन
भुसावळ रेल्वे विभागातील चाळीसगाव,पाचोरा, जळगाव, शेगाव, बडनेरा, अमरावती, अकोला, ब:हाणपूर, खंडवा, नांदगाव या रेल्वे स्थानकावर आणखी मशिन बसतील.
या ठिकाणी आहेत मशिन
भुसावळ स्थानकावरील एक-तीन, चार-सहावर तीन, मनमाड येथे तीन व नाशिक येथे फलाट क्रमांक एक, दोन,तीन वर वॉटर व्हेडींग मशीनची उभारणी करण्यात आली आहे.