शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या भेटीसाठी 500 रुपये, जळगाव येथील कारागृहातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:56 IST

सहा महिन्यात सहा जण निलंबित

ठळक मुद्देसहा महिन्यापासून अधीक्षकच नाहीअधीक्षकाच्या निलंबनानंतरही नाही घेतला धडा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 05- कारागृहातील कैद्यांना ठरवूनदिलेल्या वेळेनंतर बाहेरुन खिडकीद्वारे भेटायचे असेल तर 100 रुपये व आतमध्ये जावून भेट घ्यावयाची असेल तर 500 रुपये मोजावे लागतात, याशिवाय दवाखान्याचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठीही एका दिवसाचे 3 ते 5 हजार रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कैद्यांशी लागेबांधे ठेवून त्यांचे नातेवाईक व मित्रांच्या भेटी घालून देणे, अनधिकृतपणे जेवणाच्या डब्यासह अन्य वस्तू पुरविणे यासह अन्य कारनामे केल्याने कारागृहातील सुभेदार पंडित बाळू बोरसे, रक्षक सूर्यभान एकनाथ पवार, साहेबराव भाईदास चव्हाण व विजय कोडाजी सोडस या चार जणांवर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर कारागृहातील अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. दरम्यान सुभेदार बोरसे व चव्हाण यांना पैठण तर पवरी लातूर व विजय सोडस यांना निलंबन काळात धुळे येथेनियुक्ती देण्यात आली आहे. अधीक्षकाच्या निलंबनानंतरही नाही घेतला धडामे 2016 मध्ये कारागृहाचे अधीक्षक डी.टी.डाबेराव व रक्षक आमले हे दोघं जण निलंबित झाले होते. दवाखान्यात दाखल करण्यासाठी कैद्याच्या नातेवाईकाकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना दोघांना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कु:हाड कोसळली.             इतकी मोठी घटना घडल्यानंतरही कारागृहातील अधिकारी व कर्मचा:यांनी धडा घेतला नाही, उलट हा प्रकार जास्त प्रमाणात सुरु झाला.आता सहा महिन्यात सहा जण निलंबित झाले आहेत.सहा महिन्यापासून अधीक्षकच नाहीडाबेराव यांच्यावर कारवाई झाल्यानंतर येथे नव्याने अधीक्षक नेमण्यात आलेला नाही. वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनील कुवर यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. कुंवर हे नाशिक येथून बदलून आले आहेत. तेथेही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. कुख्यात गुन्हेगारांजवळ मोबाईल आढळून आल्याचे प्रकरण कुंवर यांच्या अंगाशी आले होते. सध्या त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे त्यांना जळगावला नियुक्ती देण्यात आली.अनेक कर्मचारी गुंतले.. कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे, अनाधिकृतपणे कैद्यांच्या भेटी घेऊ देणे, खुनाच्या गुनतील कैद्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबविणे, सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणणे, प्रभारी कारागृह अधीक्षकांच्या गैरहजेरीत नियमावलीचे पालन न करणे, कैद्यांशी संबंध ठेवणे यासह अन्य गंभीर ठपके निलंबित कर्मचा:यांवर ठेवण्यात आले आहेत. हे प्रकार त्यांच्याच बाबतीत आहेत असे नाही,अनेक दिवसापासून हे प्रकार सुरु असून त्यात काही कर्मचारी गुंतलेले असल्याचा आरोप होत आहे.